सिंगलसाठी सिंगलसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:17 AM2021-07-21T04:17:10+5:302021-07-21T04:17:10+5:30
गडहिंग्लज : बुगडीकट्टी (ता. गडहिंग्लज) येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक कामाना नाईक यांनी कोरोनापासून संरक्षण व्हावे यासाठी मास्क, सॅनिटायझरचे वाटप ...
गडहिंग्लज : बुगडीकट्टी (ता. गडहिंग्लज) येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक कामाना नाईक यांनी कोरोनापासून संरक्षण व्हावे यासाठी मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले. यावेळी सरपंच दयानंद देसाई, उपसरपंच मायाप्पा धनगर, रुदाप्पा देसाई, श्रीकांत नडगिरे, इराप्पा हुगाई, शिवाजी परीट, कुमार नाईक आदी उपस्थित होते.
-----------------------
२) नेसरी परिसरात भात रोप लागणीला वेग
नेसरी : नेसरी (ता. गडहिंग्लज) परिसरात पावसाने जोर वाढविल्याने खोळंबलेली भात रोप लागण करण्यासही शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे. दोन-चार दिवस परिसरातील शेतकरी चिखलगुठ्ठा करून भात रोप लागण करण्याची कामे उरकण्यासाठी धडपडत आहेत.
-----------------------
३) हेळेवाडी शाळेस 'अ' श्रेणी
गडहिंग्लज : हेळेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील प्राथमिक शाळेस जिल्हास्तरीय शाळा सिद्धी बाह्य मूल्यमापन समितीने भेट दिली. समितीत विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे, केंद्रप्रमुख कार्वेचे बी. एच. प्रधान, गडहिंग्लज निर्धारक नंदकुमार देसाई यांचा समावेश होता. समितीने शालेय राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन ही श्रेणी दिली. यावेळी मुख्याध्यापिका यल्लूताई नाईक, लक्ष्मीकांत नाईक आदी उपस्थित होते.
-----------------------
४) मलिग्रे परिसरात लसीकरणास प्रारंभ
गडहिंग्लज : मलिग्रे (ता. आजरा) प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावातील लहान बालकांसाठी न्यूमोकोकल कॉज्युगेट व्हॅक्सिन (पी.सी.व्ही.) लसीकरणाचा प्रारंभ जि. प. सदस्या सुनीता रेडेकर यांच्या हस्ते झाला. वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र गुरव यांनी लसीकरणाची माहिती दिली. यावेळी उपसभापती वर्षा बागडी, आरोग्यसेवक, सेविका, आशा स्वयंसेविका व कर्मचारी उपस्थित होते.
-------------------------
५) वाघोत्रेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
माणगाव : वाघोत्रे (ता. चंदगड) येथील शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील यांनी १ ली ते ७ वीच्या विद्यार्थ्यांना अक्षरे सुधारण्यासाठी चाररेषा वह्या, जेलपेन, अंक पाढे गुणाकार येण्यासाठी चौकोनी घराघराच्या वह्या, पेन्सील, खोडरबर आदी शैक्षणिक साहित्य स्व:खर्चातून वितरित केले. यावेळी सरपंच संतोष गावडे, मुख्याध्यापक संजय पाटील, भिवा गावडे, अतुल चेंडकाळे आदी उपस्थित होते.