सिंगलसाठी सिंगलसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:29 AM2021-08-14T04:29:56+5:302021-08-14T04:29:56+5:30

गडहिंग्लज : येथील ओंकार महाविद्यालयात ऑनलाईन कार्यशाळा पार पडली. प्र. प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. विजय ...

For singles for singles | सिंगलसाठी सिंगलसाठी

सिंगलसाठी सिंगलसाठी

Next

गडहिंग्लज : येथील ओंकार महाविद्यालयात ऑनलाईन कार्यशाळा पार पडली. प्र. प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. विजय माने, डॉ. अनिल पाटील यांनी मार्गदर्शन केले. डॉ. ज्ञानराजा चिघळीकर यांनी स्वागत केले. कार्यशाळेत गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील ४२ प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी सहभागी झाले होते.

---------------------

२) गडहिंग्लजमध्ये गराडे यांचा सत्कार

गडहिंग्लज : येथील सहायक निबंधक कार्यालयाकडे नव्याने रुजू झालेले सहायक निबंधक अमित गराडे यांचा गडहिंग्लज तालुका सचिव संघटनेतर्फे गुरुगोंडा पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. व्ही. जी. जाधव यांची बदली झाल्याने हे पद रिक्त झाले होते. यावेळी नारायण चव्हाण, विनोद वाईंगडे, गजेंद्र कुरळे, भैरू डोळे, मारुती मस्करी आदी उपस्थित होते.

-------------------------

३) अडकूरसाठी निधीची मागणी

माणगाव : चंदगड तालुक्यातील आजूबाजूच्या खेड्यांसाठी बाजारपेठेसाठी सोयीचे असणाऱ्या अडकूर (ता. चंदगड) ला विकासकामांसाठी २५ लाखांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी युनिटी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. गावातील रस्ते, ओपन जीम, नाना-नानी पार्क येथील विकासासाठी हा निधी देण्याची मागणी केली आहे.

शिष्टमंडळात, मनोहर देसाई, सुजित आर्दाळकर, रमेश सोनार, अनुज पाटील, महेश अंबीटकर, प्रकाश इंगवले, शंकर भेकणे, शिवाजी देसाई, कृष्णा सुतार, देवानंद सुतार आदींचा समावेश होता.

-------------------------

४) प्रवेशासाठी आवाहन

कोवाड : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बी.ए., बी.सी.ए., आणि बी.एस्सीच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती प्र. प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील यांनी दिली.

Web Title: For singles for singles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.