सिंगलसाठी सिंगलसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:21 AM2021-05-01T04:21:37+5:302021-05-01T04:21:37+5:30
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयाच्या पदवी स्तरावरील सत्र १ व २ च्या परीक्षांना ५ मे पासून सुरुवात होत ...
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयाच्या पदवी स्तरावरील सत्र १ व २ च्या परीक्षांना ५ मे पासून सुरुवात होत आहे. कोरोनामुळे ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होत असून विद्यार्थ्यांनी घरी राहूनच ऑनलाईन परीक्षा द्यावयाची आहे. परीक्षेसंदर्भात कोणत्याही शंका असतील तर महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांनी केले आहे.
----------------------
२) धनसंपदा पतसंस्थेला ५० लाखांचा नफा
गडहिंग्लज :
येथील धनसंपदा नागरी सहकारी पतसंस्थेला चालू आर्थिक वर्षात मार्चअखेर ५० लाख ४ हजार ८८१ रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष उदय जोशी यांनी दिली.
संस्थेकडे ४४ कोटी १७ लाखांच्या ठेवी असून २२ कोटी १९ लाखांचे कर्ज संस्थेने वितरित केले आहे.
संस्थेचे खेळते भाडंवल ५२ कोटी ६२ लाख असून २७ कोटी ३ लाखांची गुंतवणूक केली आहे. स्व:निधी ६ कोटी ६२ लाख इतका आहे.
यावर्षीही सभासदांना १५ टक्के लाभांश देण्यात येणार आहे. संस्थेने सामाजिक बांधीलकीतून कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीला १ लाखाची मदत केली आहे.