सिंगलसाठी सिंगलसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:21 AM2021-05-15T04:21:14+5:302021-05-15T04:21:14+5:30
गडहिंग्लज : उत्तूर (ता. आजरा) येथील आदर्श युवा ग्रुपने कै. मुकुंदराव आपटे फाडंडेशनतर्फे जि. प. सदस्य उमेश आपटे यांनी ...
गडहिंग्लज : उत्तूर (ता. आजरा) येथील आदर्श युवा ग्रुपने कै. मुकुंदराव आपटे फाडंडेशनतर्फे जि. प. सदस्य उमेश आपटे यांनी मुमेवाडी येथे कोविड सेंटर सुरू केले आहे. कोविड सेंटरवर येणारा ताण लक्षात घेऊन ३३३३३ रुपयांची आर्थिक मदत ग्रुपने दिली. तसेच रुग्णांना फळेही वाटप करण्यात आली. यावेळी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
------------------------
२) उत्तूरच्या धुरे परिवाराकडून मदत
गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेकडे कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असणारे अमर नाईक यांच्या उपचारासाठी उत्तूर येथील धुरे परिवाराने ११ हजारांची मदत देण्यात आली. अमर हा गेल्या अनेक दिवसांपासून कॅन्सरने त्रस्त आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने नाईक कुटुंबाने समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांना मदतीचे आवाहन केले होते. यावेळी सुरेश धुरे, सावरे, अझर नंदीकर, अभिजीत सासूलकर, गणेश नाईक उपस्थित होते.
------------------------
३) परीक्षेच्या अर्जास मुदतवाढ
गडहिंग्लज : तंत्रशिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या पॉलिटेक्निक उन्हाळी परीक्षेच्या अर्ज भरण्यासाठीची मुदत १२ मे अखेर होती. मात्र, कोरोनामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन १८ मेअखेर अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच २३ मेअखेर दंडासहित परीक्षा अर्ज भरता येतील, अशी माहिती तंत्रशिक्षण मंडळाचे सचिव डॉ. महेंद्र चितलांगे यांनी दिली.
------------------------
४) आजऱ्यात पोलिसांना मास्कचे वाटप
गडहिंग्लज : मडिलगे (ता. आजरा) येथील सामाजिक कार्यकर्ते अंकुश आयवाळे यांनी कोरोनापासून बचाव होण्यासाठी आजरा पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड यांना मास्कचे वाटप केले. सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांच्याकडे हे मास्क सुपुर्द केले. यावेळी अभिजीत पवार, अनिल तराळ, दत्ता शिंदे आदी उपस्थित होते.
----------------------
५) ‘अंकुर’तर्फे मोफत औषधांची सुविधा
गडहिंग्लज : कोरोना प्रतिबंधासाठी व कोरोनामुक्त रुग्णांवर उपयुक्त असलेले मेथॅलाइन ब्ल्यू हे औषध गरजू लोकांसाठी येथील अंकुर नेत्र रुग्णालयातर्फे मोफत देण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. सदानंद पाटील यांनी दिली. कोरोना काळात विविध देशात मेथॅलाइन ब्ल्यू या औषधाचा वापर केला जात आहे. हे औषध सर्वत्र उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. ज्या रुग्णांना त्यांच्या डॉक्टरांनी हे औषध घेण्याचा सल्ला दिला आहे व त्यांना ते उपलब्ध होत नसल्यास अंकुर रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. पाटणे यांनी केले आहे.