साहेब, दवाखान्यात जातोय...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:21 AM2021-04-12T04:21:57+5:302021-04-12T04:21:57+5:30
कोल्हापूर : साहेब, दवाखान्यात जातोय..., औषध संपलंय... मेडिकल दुकानात निघालोय..., भावाला रेल्वे स्टेशनवर आणायला निघालोय... आदी नेहमीची कारणे देत ...
कोल्हापूर : साहेब, दवाखान्यात जातोय..., औषध संपलंय... मेडिकल दुकानात निघालोय..., भावाला रेल्वे स्टेशनवर आणायला निघालोय... आदी नेहमीची कारणे देत काही नागरिक हे पोलीस यंत्रणेलाही चकवा देत सैरसपाटा मारून येतातच. लॉकडाऊनच्या परिस्थितीत दिवसरात्र रस्त्यावर बंदोबस्त करून कोरोनापासून नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी उचललेल्या पोलिसांच्याही डोळ्यात नागरिकांकडून खोटे बोलून धूळ फेकली जात आहे. अशा गांभीर्य नसलेल्या व निर्मनुष्य रस्त्यावर विनाकारण भटकणाऱ्यांना पोलिसांनी इंगा दाखवावाच. शनिवार व रविवार या वीकेंड लॉकडाऊनच्या दोन दिवसांत तब्बल १४७२ जणांवर कारवाई करून सुमारे चार लाखांहून अधिक रकमेचा दंड वसूल केला.
‘कोरोना संसर्गाची साखळी तोडायची आहे, त्यासाठी घरीच बसा’ असे आवाहन शासनाने वारंवार करूनही लॉकडाऊनचे गांभीर्य नसलेले व समाजात कोरोना संसर्गाचा धोका निर्माण करणारे हे पोलिसांची तमाही न बाळगता आज उथळमाथ्याने सुनसान रस्त्यावरुन बिनदिक्कत फिरताहेत. अशा माथेफिरुंसाठी दंडाचा कोलदांडा आहेच. विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी कोठे निघालात? या प्रश्नावर नेहमीचीच कारणे आजही बंदोबस्तातील पोलिसांच्या कानी पडताहेत.
‘वीकेंड लॉकडाऊन’मधील कारवाई
- विनामास्क : १५९ जणांकडून ७९,५०० रुपये दंड
- वाहतूक : १३१३ जणांकडून ३,२१,८०० रुपये दंड
- एकूण दंड वसूल : ४,०१,३०० रुपये वसूल
कोरोनाचेही कारण....
काहीवेळा चाणाक्ष फिरणारे आताच कोरोना चाचणी करण्यासाठी निघालोय अगर जाऊन आलोय. अशी कारणे देऊन रस्त्यात अडविणाऱ्या पोलिसांसमोर सांगतात, कारण ऐकताच चौकशी करणारा पोलीस चार हात दूर होऊन त्याला पुढे जावा असाच सल्ला देऊन स्वत:ची सुटका करून घेतात. ही शक्कल अलीकडे लॉकडाऊनमध्ये विनाकारण रस्त्यावरुन फिरणाऱ्या युवा पिढीकडून ऐकावयास मिळत आहे.
शनिवारची कारवाई
कारवाई : राजारामपुरी पो. ठाणे - शाहूपुरी - लक्ष्मीपुरी- राजवाडा -शहर वाहतूक शाखा- दंड वसूल
विनामास्क : १६ - ४८ - १० - ३१ - ७- ५६,००० रुपये
वाहतूक : १४ - ४८ - ३९ - ५२ - ५८४ - १,८४,२०० रुपये
रविवारची कारवाई
कारवाई : राजारामपुरी पो. ठाणे - शाहूपुरी - लक्ष्मीपुरी- राजवाडा -शहर वाहतूक शाखा- दंड वसूल
विनामास्क : १२ - १० - ०४ - १३ - ८- २३,५०० रुपये
वाहतूक : १६ - ५४ - ५७ - २५ - ४२४ - १,३७,६०० रुपये
फोटो नं. ११०४२०२१-कोल-वीकेंड लॉकडाऊन प्लॉन
ओळ : वीकेंड लॉकडाऊनमध्ये रविवारी दसरा चौकात खुलेआम फिरणाऱ्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. (छाया: नसीर अत्तार)
===Photopath===
110421\11kol_7_11042021_5.jpg
===Caption===
ओळ : वीकेंड लॉकडाऊनमध्ये रविवारी दसरा चौकात खुलेआम फिरणार्यांना पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. (छाया: नसीर अत्तार)