साहेब, आमचं तेवढं पुनर्वसन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:25 AM2021-07-29T04:25:14+5:302021-07-29T04:25:14+5:30

सतीश पाटील शिरोली : प्रत्येक वर्षी महापुरामुळे आमचे नुकसान होत आहे. त्यामुळे साहेब, आमचं तेवढं पुनर्वसन करा, अशी ...

Sir, rehabilitate us so much | साहेब, आमचं तेवढं पुनर्वसन करा

साहेब, आमचं तेवढं पुनर्वसन करा

googlenewsNext

सतीश पाटील

शिरोली : प्रत्येक वर्षी महापुरामुळे आमचे नुकसान होत आहे. त्यामुळे साहेब, आमचं तेवढं पुनर्वसन करा, अशी मागणी हालोंडीच्या नागरिकांनी पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजूबाबा आवळे उपस्थित होते.

कोल्हापूर-सांगली मार्गावर असलेले हातकणंगले तालुक्यातील हालोंडी गाव. या गावची लोकसंख्या जेमतेम तीन हजारांच्या घरात. ५०० हून अधिक पशुधन, ६०० एकर शेती. या गावाला प्रत्येक वर्षी पंचगंगा नदीला पूर आला की पुराचा वेढा बसतो. प्रत्येक वर्षी बेटाचे स्वरूप प्राप्त होते. यावेळी आलेल्या महापुराच्या पाण्यात गावातील तीन हजार लोक आसपासच्या गावांत जागा भेटेल तिकडे स्थलांतरित झाले. हालोंडीकरांचे पुरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वर्षभर कष्ट करून कमावलेला पैसा, धान्य, प्रापंचिक साहित्य क्षणार्धात डोळ्यासमोर पुरामधून वाहून गेले. याचा पार त्रास होतोय.. आम्हाला आमचे पुनर्वसन करून नुकसान भरपाई द्या, या शब्दांत हालोंडीकरांनी आपली व्यथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडली. यावर पवार यांनी येथील घरे, इमारती शासनाच्या ताब्यात देत असल्याचा ठराव करून पाठविल्यास शासन पुनर्वसन करेल, असे आश्वासन दिले. यावेळी हालोंडी गावचे सरपंच जयश्री कोळी, उपसरपंच महावीर पाटील, जे. बी. पाटील, प्रदीप पाटील, अनिल पाटील, ग्रामपंचायत सदस्य वर्धमान बेळंके, सुनीता पाटील, सुनीता शेटे, अजय पाटील, किरण कांबळे, रूपाली कांबळे, अलका माने, दिलीप पाटील, जयप्रकाश पाटील उपस्थित होते.

कोट :

आमच्या गावाला प्रत्येक वर्षी पंचगंगा नदीचा वेढा बसून पुराचे पाणी येते. गाव प्रत्येक वर्षी स्थलांतरित करावे लागते. त्यामुळे कायमस्वरूपी तोडगा काढून शासनाने आमचे पुनर्वसन करावे. - जयश्री कोळी, सरपंच

कोट :

प्रत्येक वर्षी पूर आला की जनावरे, प्रापंचिक साहित्य घेऊन बाहेर पडावे लागते. पूर ओसरला की पुन्हा गावात यायचं. हे चक्र कित्येक‌ वर्षे सुरू आहे. शासनाने आसपासच्या गावांत जागा देऊन आमचं पुनर्वसन करावे.

- महावीर पाटील, उपसरपंच

कोट :

गावात ५०० पशुधन आहे. ७०० एकर शेती आहे. प्रत्येक वर्षी पंचगंगा नदीला पूर आला की आमची शेती पुराच्या पाण्यात जाते. महापुरामुळे जनावरे घेऊन बाहेर जावे लागते. हालोंडीचे पुनर्वसन होणे गरजेच आहे.

- वर्धमान बेळंके, ग्रामपंचायत सदस्य.

फोटो : २८ हालोंडी ग्राऊंड रिपोर्ट

पूर परिस्थतीची पाहणी करण्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर हालोंडीकरांनी गाऱ्हाणे मांडले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजूबाबा आवळे उपस्थित होते.

Web Title: Sir, rehabilitate us so much

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.