साहेब... सत्काराबरोबर कायम करायचे तेवढे बघा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 10:36 AM2020-04-18T10:36:47+5:302020-04-18T10:39:08+5:30

जगात कोरोनो विषाणूने थैमान घातला आहे. खासगी कंपनी, व्यवसाय येथील कर्मचारी सुट्टीवर आहेत; तर कोल्हापूर महापालिकेचा सफाई कर्मचारी जिवाची पर्वा न करता अहोरात्र काम करीत आहेत. कोल्हापूरकरांकडून त्यांना भरघोस सहकार्य होत आहे.

Sir ... See how you can stay with Sakkar! | साहेब... सत्काराबरोबर कायम करायचे तेवढे बघा!

साहेब... सत्काराबरोबर कायम करायचे तेवढे बघा!

Next

विनोद सावंत
कोल्हापूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गल्लीबोळामध्ये सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार केला जात आहे. सत्कार करणे चांगलेच आहे; परंतु गेल्या २०-२२ वर्र्षांपासून कायम होणार या आशेने रोजंदारीवर काम करणाºया कर्मचाऱ्यांची ह्यसाहेब... सत्काराबरोबर कायम करायचे तेवढे बघा,ह्ण अशी भावना व्यक्त होत आहे. महापूर असो की कोरोना; जिवाची पर्वा न करता काम करणा-या या कर्मचा-यांचा आता तरी महापालिका विचार करणार की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

 जगात कोरोनो विषाणूने थैमान घातला आहे. खासगी कंपनी, व्यवसाय येथील कर्मचारी सुट्टीवर आहेत; तर कोल्हापूर महापालिकेचा सफाई कर्मचारी जिवाची पर्वा न करता अहोरात्र काम करीत आहेत. कोल्हापूरकरांकडून त्यांना भरघोस सहकार्य होत आहे. मास्क, सॅनिटायझर, हँडग्लोव्हज, गमबूट-सॉक्स देण्यात येत आहे. तसेच गल्लीबोळात त्यांना कोल्हापुरी फेटे, नोटांचा हार, पुष्पवृष्टी, औक्षण केले जात आहे.

नागरिकांसह आजी-माजी नगरसेवक यासाठी पुढाकार घेत आहेत. आपत्कालीन परिस्थिती काम करीत असल्याबद्दल सत्कारास ते पात्र आहेत; परंतु सत्कार केला, विषय संपला, असे होता कामा नये. २० ते २२ वर्षे प्रामाणिकपणे पहाटे उठून परिसराची स्वच्छता करणाºया या सफाई कर्मचाºयांचे कायम होण्याचे स्वप्न पूर्ण करणे हाच त्यांचा खरा सन्मान ठरणार आहे. महापालिकेतील सत्ता असणारे नेते आणि नगरसेवकांनी पुढाकार घेतल्यास हे शक्य आहे.

आरोग्य विभागातील स्थिती 
एकूण कर्मचारी- २०००
कायम कर्मचारी - १६५०
 झाडू कामगार- १२५०


रोजंदारीवरील कर्मचारी- ३५०
सफाई कर्मचारी- २५०
ड्रेनेज सफाई कर्मचारी- ६८
टिपरवर हेल्पर- १०४
आरोग्य निरीक्षक - १६
कायम आरोग्य निरीक्षक- २

  रोजंदारी कर्मचा-यांसमोरील समस्या
- हजेरी भरली तरच पगार
- महापालिकेच्या सुविधांपासून वंचित
- वारसाला नोकरी मिळत नाही.
- वैद्यकीय सुविधा मिळत नाही.
- वैद्यकीय रजा नाही.
- सुट्टीचा पगार नाही.

   सेवानिवृत्तीला आले तरी कायम नाही
कायम होणार या आशेवर सफाई कर्मचाºयांकडून काम केले जात आहे. काहीजण पुढील दोन-चार वर्षांनी सेवानिवृत्त होणार आहेत. पुढील दोन वर्षांत जरी ते कायम झाले तरी पेन्शन मिळणार नाही. उतारवयात उदरनिर्वाह कसा करायचा, असाही त्यांच्यासमोर प्रश्न आहे. 


अनेक वर्षांपासून काही सफाई कर्मचारी रोजंदारीवर काम करीत आहेत. त्यांना कायम करून घेणे आवश्यक आहे. मात्र, आस्थापनाचा खर्च वाढत असल्यामुळे कायम करण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. 
                                                           - जयवंत पोवार, मुख्य आरोग्य निरीक्षक, महापालिका.
 

 


गेल्या २२ वर्षांपासून प्रामाणिकपणे सफाईचे काम करीत असून अजूनही कायम नाही. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून सत्कार होतो ही आनंदाची बाब आहे; परंतु सत्काराने आमचे प्रश्न सुटणार नाहीत. कायम केल्यास आमचे स्वप्न पूर्ण होऊन हाच आमचा खरा सत्कार ठरेल.
- सिकंदर कुचकोरवी, सफाई कर्मचारी, कदमवाडी परिसर 

 

Web Title: Sir ... See how you can stay with Sakkar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.