हुपरीतील कोविड सेंटरसाठी ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:24 AM2021-05-08T04:24:01+5:302021-05-08T04:24:01+5:30
हुपरी : आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी हुपरी शहरातील कोविड सेंटर पूर्ववत सुरू करण्याचा आदेश दिला आहे. तरीसुद्धा ...
हुपरी : आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी हुपरी शहरातील कोविड सेंटर पूर्ववत सुरू करण्याचा आदेश दिला आहे. तरीसुद्धा हुपरी नगरपरिषद व आरोग्य अधिकारी यांच्याकडून हे कोविड सेंटर सुरू करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या या कृतीविरोधात संताप व्यक्त करीत हुपरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शुक्रवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.
हुपरी शहरात कोविड सेंटर सुरू करण्यात यावे व प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण नियोजनबद्द पद्धतीने व्हावे. अशी ही मागणी यावेळी करण्यात आली होती.
कोरोना संसर्गच्या पहिल्या लाटेत हुपरी शहर व परिसरात सुमारे ६०० हून अधिक रुग्ण बाधित झाले होते. यावेळीसुद्धा शहर व परिसरात मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी या ठिकाणचे कोविड सेंटर पूर्ववत सुरू करण्याचा आदेश दिला आहे. आरोग्य मंत्र्यांनी आदेश देऊनसुद्धा नगरपरिषद व आरोग्य अधिकारी यांनी त्याकडे दुर्लक्ष करून कोविड सेंटर सुरू करण्यास टाळाटाळ चालविली आहे. हुपरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नगरपरिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष सुनील गाट, अरविंद खेमलापुरे, शिवराज देसाई, पृथ्वीराज गायकवाड, अमर कलावंत, राजेंद्र पाटील, धनाजी शिंदे, चांद नायकवडे, तानाजी फडतारे, बाहुबली गाट, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
-------:-----
फोटो ओळी - हुपरी (ता. हातकणंगले) शहरात कोविड सेंटर सुरू करण्यात यावे व प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण नियोजनबद्ध पद्धतीने व्हावे. या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हुपरी नगरपरिषद कार्यालयासमोर शुक्रवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.