SITने जारी केली कॉ. पानसरेंच्या मारेक-यांची रेखाचित्रे
By admin | Published: June 6, 2015 12:20 PM2015-06-06T12:20:38+5:302015-06-06T13:59:01+5:30
कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील सीसीटीव्ही फूटेज एसआयटीच्या हाती लागले असून एसआयटीने दोन मारेक-यांची रेखाचित्रे जारी केली आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. ६ - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील सीसीटीव्ही फूटेज एसआयटीच्या हाती लागले असून एसआयटीने दोन मारेक-यांची रेखाचित्रे जारी केली आहेत. आज कोल्हापुरात एसआयटीने पत्रकार परिषद घेऊन काही महत्वाच्या गोष्टींचा खुलासा केला.
याप्रकरणी दोन ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज मिळाले असून त्यात दोन मोटरसायकल्स आढळल्या तसेच आरोपी कोणत्या मार्गाने पळाले हेही स्पष्ट झालं असे अधिका-यांनी सांगितले. तसेच त्या दोन मारेक-यांची रेखाचित्रेही आपम जारी केल्याचे ते म्हणाले. ते दोन्ही संशयित मारेकरी २० ते २५ वयोगटातील असू शकतात, असे त्यांनी नमूद केले.
कॉ. गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी १६ फेब्रुवारी बंदुकीतून गोळ्या झाडत प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात ते दोघेही गंभीर जखमी झाले होते. कॉ. गोविंद पानसरे यांची प्रकृती गंभीर बनल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र २० फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.