विकास साधण्यासाठी सीतेचा राम अयोध्यातून गोकुळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 12:10 PM2021-06-01T12:10:50+5:302021-06-01T12:15:06+5:30

Police Kolhapur : सीता-रामाच्या फायद्यासाठी वानरसेना घेऊन दुसऱ्याच्या हद्दीत चढाई करून सगळ्यांना घेऊन डुबणाऱ्यांची व ५० लाखांच्या मागणीची चर्चा सध्या कोल्हापूरच्या पोलीस दलात सुरू आहे.

Sita's Ram from Ayodhya to Gokul for development | विकास साधण्यासाठी सीतेचा राम अयोध्यातून गोकुळात

विकास साधण्यासाठी सीतेचा राम अयोध्यातून गोकुळात

googlenewsNext
ठळक मुद्देविकास साधण्यासाठी सीतेचा राम अयोध्यातून गोकुळातपनामावर केली चढाई : पन्नास लाखांच्या मागणीची पोलीस खात्यात चर्चा

तानाजी पोवार

कोल्हापूर : एखाद्याला कोणत्याही गुन्ह्यात गुंतवायचेच असेल, तर त्याला खाकी कशाही पध्दतीने गुंतवू शकते, त्यानंतर प्रकरण मिटवण्यासाठी आर्थिक ढपलाही पाडण्यासाठी यंत्रणा पुढे सरसावते, त्याला प्रतिसाद मिळाली नाही, तर जुन्या गुन्ह्यात कलमे वाढवण्याची शक्कलही लढवली जाते. असाच काहीसा प्रकार कोल्हापूरच्या शाहूनगरीत घडला. सीता-रामाच्या फायद्यासाठी वानरसेना घेऊन दुसऱ्याच्या हद्दीत चढाई करून सगळ्यांना घेऊन डुबणाऱ्यांची व ५० लाखांच्या मागणीची चर्चा सध्या पोलीस दलात सुरू आहे.

महिन्यापूर्वी कोल्हापूर शहराच्या शाहूनगरीत खाकीने एका ठिकाणी कारवाई करत स्वत:चा विकास साधला. विकासाचे धागेदोरे शोधण्याचे निमित्त काढून त्याच रात्री गुपचूप अंधारात ह्यपनामाह्ण हे लहानग्यांचे खेळण्याचे ठिकाण गाठले. खरे तर गोकुळात शिरकाव करून त्यांनी हद्दपारीच केली. बंद पनामाच्या मुख्य गेटवरून आवारात उडया टाकून सात ते आठ खाकी च्या वानरसेनेने "सीता-रामा"च्या साक्षीने अक्षरशा दरोडाच टाकला. 

पनामाच्या मुख्य इमारतीत प्रवेश करताना दरवाजाचे शटर, कडीकोयंडा तोडला. आत लाईट न लावताच बॅटरीच्या उजेडात सुमारे अर्धा तासाहून अधिक काळ तपासणीत घालवला. पुढे चार दिवसँत ह्यपनामाह्णच्या मालकास खाकीवर कृपादृष्टी असलेल्या विनायकने ५० लाखाचा निरोप धाडला. त्यानंतर आता गेले काही दिवस हा ढपल्यासाठी पाठशिवणीचा खेळ रंगला आहे.

"विनायक" पावला
"राजारामा"च्या नगरीवर अलीकडे मांडवातील "विनायका"ची चांगलीच क्रुपाद्रुष्टी लाभलीय. साहेबांच्या क्रुपेने इथं त्याचा वावर वाढलाय. कोणत्याही शुभलक्ष्मी कामात इथं ४०-६० विभागणीचा डाव ठरलाय. गेल्या महिन्यात मध्यरात्री त्यांचा विकासचा गेम साधला.

कारवाईच्या धास्तीनं "खाकी"च्या आवारातच मध्यरात्री दीड वाजता आलिशान गाडीत बसून "विनायका"ने सात लाखाचा डाव साधला. इतक्या मध्यरात्री साहेबही केबीनमध्येच बसूनच होते. काही वेळाने तेही बाहेर येऊन विनायकासोबत हिश्श्याच्या विभागणीसाठी गाडीतून निघून गेले. आवारातील तिसऱ्या डोळ्यांची तपासणी केल्यास सारेच प्रकाशमान होईल.

"गोकुळा"त अतिक्रमण

"राजाराम"ची धाव तशी मध्यवस्ती, उपनगरापर्यंत... पण त्यांनी आपली हद्दपार करत "गोकुळा"तील कंदलगावात शिरकाव केला. तेथे रात्री गुपचूप छापाही टाकला, पण कारवाई पूर्वी अगर कारवाईनंतर शासकीय नजर असणाऱ्या "सीसीटीएनएस" वर त्याची नोंद न केल्याची चर्चा आहे, त्याचे परिणामही त्यांना लवकरच भोगावे लागणार, हे निश्चित!

Web Title: Sita's Ram from Ayodhya to Gokul for development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.