आरटीओ कार्यालयासमोर वाहनधारक महासंघाचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 06:41 PM2020-12-14T18:41:09+5:302020-12-14T18:41:44+5:30
Rto, Kolhapurnews लर्निंग लायसेन्स विभागातील कर्मचारी परीक्षार्थ्यांना अरेरावी, उद्धट वर्तन करीत असल्यावरून कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाच्यावतीने सोमवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन केले. संबंधितांवर कठोर कारवाईच्या मागणीचे निवदेन प्रादेशिक परिवहन अधिकारी स्टीवन अल्वारीस यांना देण्यात आले.
कोल्हापूर : लर्निंग लायसेन्स विभागातील कर्मचारी परीक्षार्थ्यांना अरेरावी, उद्धट वर्तन करीत असल्यावरून कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाच्यावतीने सोमवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन केले. संबंधितांवर कठोर कारवाईच्या मागणीचे निवदेन प्रादेशिक परिवहन अधिकारी स्टीवन अल्वारीस यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, लर्निंग लायसन्स विभागातील कनिष्ठ लिपिकाकडून पपरीक्षार्थ्यांशी उद्धट बोलून अपमान करीत असल्याची लेखी तक्रार करूनही कारवाई झालेली नाही. त्याच्याकडून दादागिरी सुरूच ठेवली आहे. वाहनधारक संघटनेच्या सभासदाच्या मुलासोबतही त्यांनी वाद घातला.
माझ्या विरोधात कोणाकडे तक्रार करणार, तेथे मी पण तुमच्याबरोबर येतो. माझ्यावर काय फरक पडत नाही, अशी धमकीही दिली. अशा प्रवृत्तींना वेळीच रोखले पाहिजे. यासाठी त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा वाहनधारक संघाचे राजेंद्र जाधव, चंद्रकांत भोसले, अभिषेक देवणे, विजय गायकवाड, विजय जेधे, दिलीप सूर्यवंशी, वसंत पाटील, दीपक पोवार, उत्तम मुरावणे, आदींनी दिला.