महापालिकेची घरफाळ्यात सहा टक्के सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:18 AM2021-06-04T04:18:25+5:302021-06-04T04:18:25+5:30

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या यापूर्वीच्या मंजूर केलेल्या धोरणानुसार दि. ३० जूनअखेर मालमत्ताकर भरणाऱ्या करदात्यांसाठी चालू आर्थिक वर्षातील मागणीमध्ये सहा टक्के ...

Six per cent concession in municipal house tax | महापालिकेची घरफाळ्यात सहा टक्के सवलत

महापालिकेची घरफाळ्यात सहा टक्के सवलत

googlenewsNext

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या यापूर्वीच्या मंजूर केलेल्या धोरणानुसार दि. ३० जूनअखेर मालमत्ताकर भरणाऱ्या करदात्यांसाठी चालू आर्थिक वर्षातील मागणीमध्ये सहा टक्के सवलत देण्यात येणार आहे, या सवलतीचा जास्तीत जास्त मिळकतधारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त विनायक औंधकर यांनी केले आहे.

महानगरपालिका हद्दीमधील मालमत्ता कराची सन २०२१-२२ या सालाकरिता देय असणारी घरफाळा बिले महानगरपालिका प्रशासनाकडून तयार करण्यात आली आहेत. सर्वांची बिले महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

कोविड १९ अंतर्गत कोल्हापूर शहरात कराव्या लागणाऱ्या उपाययोजना राबविण्यात महानगरपालिका पूर्ण क्षमतेने काम करीत आहे. सध्या महानगरपालिकेची वसुली कमी असल्याने विविध कामगिरी करण्यावर आर्थिक उपलब्धतेमुळे अडचणी येत आहेत. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी चालू आर्थिक वर्षाची देयके तत्काळ तयार करून महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत आदेश दिले होते. त्याप्रमाणे घरफाळा विभागाकडील सर्व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून सर्व मिळकतींचे देयके तयार करून संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहेत.

शहरातील सर्व मिळकतधारकांनी संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अथवा महानगरपालिकेच्या पाचही नागरी सुविधा केंद्रांमध्ये सकाळी नऊ ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत आपल्या कराचा भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे. ऑनलाइन भरणा करताना काही अडचणी असल्यास महापालिकेच्या डेटा सेंटर (फोन नंबर ०२३१ -२५४०९८८) या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Web Title: Six per cent concession in municipal house tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.