कोल्हापूर जिल्ह्यात सहा मतदारसंघांत शेजारच्या तालुक्यांची अडक, उमेदवारांची होते दमछाक 

By विश्वास पाटील | Published: October 25, 2024 06:07 PM2024-10-25T18:07:06+5:302024-10-25T18:08:16+5:30

सर्वाधिक मतदान केंद्रे, निकाल बदलवणारे मताधिक्य कोणत्या मतदारसंघात.. वाचा सविस्तर

six constituencies are included in neighboring taluka causing difficulties for the candidates In Kolhapur district | कोल्हापूर जिल्ह्यात सहा मतदारसंघांत शेजारच्या तालुक्यांची अडक, उमेदवारांची होते दमछाक 

कोल्हापूर जिल्ह्यात सहा मतदारसंघांत शेजारच्या तालुक्यांची अडक, उमेदवारांची होते दमछाक 

विश्वास पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील दहापैकी सहा मतदारसंघात शेजारच्या तालुक्यांची अडक असल्याने या तालुक्यांचे राजकारण सांभाळताना विधानसभेच्या उमेदवारांना चांगलीच दमछाक होते. कोल्हापूर उत्तर, हातकणंगले, शिरोळ आणि इचलकरंजी हे चार मतदारसंघ मात्र त्या त्या शहर किंवा तालुक्यापुरते मर्यादित आहेत. आजरा तालुक्याची तीन शकले झाली असून त्याचा प्रत्येकी एक भाग कागल, राधानगरी व चंदगड मतदारसंघात समाविष्ट आहे.

कशी आहे मतदारसंघाची रचना..

चंदगड :
आजरा (१ ते ४२ अशी ४२ मतदान केंद्रे) : पुरुष : १६१८२, स्त्री- १७३०८ : एकूण ३३४९०.
गडहिंग्लज (४३ ते १८२ एकूण १४० केंद्रे) : पुरुष ६५४२६ स्त्री - ६६७३२ : एकूण १३२१६७.
चंदगड (१८३ ते ३९० एकूण २०८ ) : पुरुष ८०७७६ स्त्री- ७८६५६ : एकूण १५९४३२
एकूण केंद्रे : ३९० : पुरुष : १६२३८४, स्त्री : १६२६९६ : एकूण ३२५०८९.

राधानगरी :
राधानगरी (१ ते २०५ : एकूण २०५ केंद्रे) पुरुष : ८९७०८ : स्त्री-८१९८६ एकूण-१७१७०१
भुदरगड (२०६ ते ३७७ : एकूण १७२) पुरुष : ६७२९४ : स्त्री - ६४३०१ : एकूण १,३१,६००
आजरा (३७८ ते ४२५ : एकूण ४८ ) पुरुष : १८८३५ : स्त्री १८८४२ : एकूण ३७६७७
एकूण केंद्रे : ४२५ : पुरुष-१७५८३७ स्त्री - १६५१२९ एकूण : ३,४० ९७८.

कागल :
कागल (१ ते २४५ एकूण २४५) पुरुष : ११८९१४ : स्त्री - ११७१९० एकूण : २३६१०७
आजरा (२४६ ते २९२ एकूण ४७) पुरुष : १८३३५ : स्त्री - १९४४३ एकूण : ३७७७८
गडहिंग्लज (२९३ ते ३५८ एकूण ६६) पुरुष : ३२५६९ : स्त्री - ३३३८८ एकूण : ६५९५९
एकूण केंद्रे : ३५८ : पुरुष-१६९८१८७ स्त्री - १७००२१ एकूण : ३३९८४४.

कोल्हापूर दक्षिण :
शहर (१ ते १८६ एकूण १८६) पुरुष : ९३७६३ : स्त्री - ९४१०४ एकूण : १८७८८४
ग्रामीण (१८७ ते ३५४ एकूण १६८) पुरुष : ९२११७ : स्त्री - ८९१६० एकूण : १८१३११
एकूण केंद्रे : ३५४ : पुरुष-१८५८८० स्त्री - १८३२६४ एकूण : ३६९१९५.

करवीर :
पन्हाळा (१ ते ८५ एकूण ८५) पुरुष : ३९१३३ : स्त्री -३६१४० एकूण : ७५२७३
गगनबावडा (८६ ते १२९ एकूण ४४) पुरुष : १४९८८ : स्त्री - १३५१५ एकूण : २८५०३
करवीर : (१३० ते ३५८ एकूण २२९) पुरुष : ११२४४४ : स्त्री - १०५१६९ एकूण : २१७६१३
एकूण केंद्रे : ३५८ : पुरुष-१६६५६५ स्त्री - १५४८२४ एकूण : ३२१३८९.

शाहूवाडी :
शाहूवाडी (१ ते १९६ एकूण १९६) पुरुष : ८२६०७ : स्त्री -७७५८५ एकूण : १६०१९२
पन्हाळा (१९७ ते ३३४ एकूण १४७) पुरुष : ७३५३२ : स्त्री - ६९७४२ एकूण : १४३२८१
एकूण केंद्रे : ३४३ : पुरुष-१५६१३९ स्त्री - १४७३२७ एकूण : ३०३४७३.

न विभागलेले मतदारसंघ

कोल्हापूर उत्तर : एकूण केंद्रे ३१५ :  पुरुष : १४८१६२ : स्त्री -१५२०८६ एकूण : ३००२६५
हातकणंगले : एकूण केंद्रे ३३४ :  पुरुष : १७२१३९ : स्त्री -१६६४७५ एकूण : ३३८६३३
इचलकरंजी : एकूण केंद्रे २६६ :  पुरुष : १५७५२८ : स्त्री -१५२२८८ एकूण : ३०९८७७
शिरोळ : एकूण केंद्रे ३०७ : पुरुष : १६२१५७ : स्त्री -१६४४२२ एकूण : ३२६५८१

निकाल बदलवणारे मताधिक्य

कागल विधानसभा मतदारसंघाचा निकाल २०१४ च्या निवडणुकीत आजरा तालुक्यातील उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघाने फिरवला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ यांना एक लाख २२ हजार २२३ मते, तर शिवसेनेच्या संजय घाटगे यांना एक लाख १६ हजार ७१८ मते मिळाली होती. मुश्रीफ पाच हजार ९३४ मतांनी विजयी झाले होते. या निवडणुकीत उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघाने त्यांना सुमारे पाच हजार ८०० मताधिक्य दिले होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे हे तेव्हा घाटगे यांच्यासोबत होते. परंतु, तरीही एका रात्रीत ही मते तेव्हा फिरली होती. या निवडणुकीतही आजरा व गडहिंग्लजमधील एक लाख तीन हजार मते फारच निर्णायक ठरणारी आहेत.

मतदान आणि गुलाल..

राधानगरी मतदारसंघात एकट्या राधानगरी तालुक्याचे मतदान एक लाख ७१ हजार ७०१ इतके आहे. भुदरगडचे एक लाख ३१ हजार ६०० आहे. परंतु, या मतदारसंघावर सातत्याने भुदरगड तालुक्यातीलच आमदारांनी वर्चस्व गाजवले आहे. हाच अनुभव शाहूवाडी मतदारसंघातही आहे. तिथे शाहूवाडी तालुक्याचे मतदान एक लाख ६० हजार १९२ आहे, तर पन्हाळा तालुक्याचे मतदान एक लाख ४३ हजार २८१ आहे. परंतु, पन्हाळ्यालाच अनेकदा गुलाल लागला आहे.

सर्वाधिक मतदान केंद्रे राधानगरीत..

राधानगरी हा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्याने या मतदारसंघात सर्वाधिक ४२५ मतदान केंद्रे आहेत. सर्वांत कमी मतदान केंद्रे ही इचलकरंजी मतदारसंघात २६६ आहेत.

मतदार कोल्हापूर दक्षिणमध्ये जास्त

कोल्हापूर दक्षिणमध्ये सर्व दहाही मतदारसंघांत सर्वाधिक तीन लाख ६९ हजार १९५ मतदार आहेत. पूर्ण शहरी असलेल्या कोल्हापूर उत्तरमध्ये तीन लाख २६५ इतके सर्वांत कमी मतदार आहेत.

Web Title: six constituencies are included in neighboring taluka causing difficulties for the candidates In Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.