सहा तास शिस्तबद्ध पोलीस बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:51 AM2018-02-19T00:51:34+5:302018-02-19T00:51:46+5:30

Six hours disciplined police settlement | सहा तास शिस्तबद्ध पोलीस बंदोबस्त

सहा तास शिस्तबद्ध पोलीस बंदोबस्त

Next

‘लोकमत’च्या महामॅरेथॉनमध्ये स्पर्धेंकांची गैरसोय होऊ नये, स्पर्धा शांततेत व उत्साही वातावरणात पार पडावी, यासाठी पोलीस दलाने खूप परिश्रम घेतले. स्पर्धेच्या मार्गावरील वाहतुकीचे नियोजन, चौका-चौकांत पोलीस असा सहा तासांचा शिस्तबद्ध बंदोबस्त पार पाडला. प्रत्येक स्पर्धकाला आपण रस्त्यावर सुरक्षित असल्याची जाणीव झाली.
‘लोकमत’ महामॅरेथॉन स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी शिस्तबद्ध पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, गृह विभागाचे पोलीस उपअधीक्षक सतीश माने, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक अशोक धुमाळ, शाहुपूरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, राजारामपुरीचे सहायक पोलीस निरीक्षक शहाजी निकम, राखीव पोलीस उपनिरीक्षक राजू शिंदे, पोलीस क्रीडा विभागप्रमुख प्रकाश पाटील यांनी मेहनत घेतली. दोन दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी संपूर्ण मार्गाची पाहणी करून बंदोबस्ताचे नियोजन केले. त्यानुसार रविवारी पहाटे चारपासून पोलीस रस्त्यावर उतरले. सुमारे सहा तास बंदोबस्त पार पाडला.
मार्गावर स्पर्धकाला कोणताही त्रास होवू नये, तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये, अशा दोन्ही बाजूंनी खबरदारी पोलिसांनी घेतली. शंभरपेक्षा जास्त बॅरिकेट लावून एकमार्गी वाहतुकीचे नियोजन केल्याने वाहनधारकांना कुठल्याही प्रकारे त्रास झाला नाही. सर्व मार्गावर शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले होते. ३ ते २१ कि. मी. मार्गावर धावणाºया प्रत्येक स्पर्धकाला आपण सुरक्षित असलेची जाणीव झाली.
पोलीस मुख्यालय मैदान, पोलीस अधीक्षक कार्यालय चौक, सेंट झेवियर्स हायस्कूल, मुख्य पोस्ट कार्यालय, पितळी गणपती, धैर्यप्रसाद चौक, सैनिक दरबार हॉल, लाईन बझार चौक, सदर बझार चौक, ताराराणी पुतळा, रेल्वे गेट, हायवे कॅन्टीन, शाहू टोल नाका, शिवाजी विद्यापीठ आदी मुख ठिकाणी बॅरिकेट लावून एकमार्गी वाहतूक करण्यात आली होती. प्रत्येक चौकात तीन-चार वाहतूक पोलीस असे सुमारे शंभर पोलीस व चार अधिकारी बंदोबस्तास होते.

यांचेही पाठबळ महत्त्वाचे
लोकमत महामॅरेथॉनचे टायटल स्पॉन्सर ‘राजुरी स्टील’ असून वारणा दूध, एच. एम. डी. ग्लोबल गु्रप, मनी ट्रेड क्वाईन गु्रप, संजय घोडावत युनिव्हर्सिटी, डी. वाय. पी. हॉस्पिटॅलिटी प्रा.लि., अ‍ॅस्टर आधार , साई सर्व्हिस, फु्रटेक्स, केट्री, संदीप युनिव्हर्सिटी, रिलायन्स स्मार्ट, रेडिओ सिटी, रिलॅक्स-झेल, नाईस, ब्रँड इट एलईडी स्क्रीन, मर्क इलेक्ट्रोबीन सीप, ‘यु टू कॅन रन ’, मोहन ट्रॅव्हल्स, गोल्डस् जीम हे प्रायोजक आहेत.
पार्किंगची व्यवस्था
स्पर्धेसाठी येणाºया वाहनधारकांसाठी पार्किंगची व्यवस्था पोलीस उद्यानासमोरील पटांगणात केली होती. प्रवेशद्वारापासून आतमध्ये वाहन पार्किंग करुन घेण्यापर्यंतची मदत वाहतूक पोलिसांनी केली. एका रांगेत वाहने पार्किंग करुन घेण्यामध्ये त्याचे मोलाचे सहकार्य लाभले.

Web Title: Six hours disciplined police settlement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.