कोल्हापूर जिल्ह्यातील सहा वकील बनले न्यायाधीश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 02:21 PM2023-01-24T14:21:59+5:302023-01-24T14:22:26+5:30
स्टेनोग्राफर पदावर कार्यरत असलेले श्रीकांत सुतार यांनीही मोठ्या चिकाटीने अभ्यास करून न्यायाधीश बनण्याचे स्वप्न साकार केले
कोल्हापूर : दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्याय दंडाधिकारी पदासाठी झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, जिल्ह्यातील सहा वकील न्यायाधीश बनले. ॲड. अमृता जाधव, ॲड. स्नेहा साकळे, ॲड. तृप्ती इंगवले, ॲड. प्रणोती वारके, ॲड. करण जाधव आणि ॲड. श्रीकांत सुतार यांनी या परीक्षेत यश संपादन केले.
ॲड. करण जाधव यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले, तर जिल्हा न्यायालयात सध्या स्टेनोग्राफर पदावर कार्यरत असलेले श्रीकांत सुतार यांनीही मोठ्या चिकाटीने अभ्यास करून न्यायाधीश बनण्याचे स्वप्न साकार केले.
२०२१ मध्ये झालेल्या पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम परीक्षा आणि त्यानंतर तोंडी परीक्षा झाली. त्यानंतर पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. प्रशिक्षणानंतर जून २०२३ पासून नवीन न्यायाधीश सेेवेत रुजू होण्याची शक्यता आहे. जिल्हा बार असोसिएशनने नूतन न्यायाधीशांचा सत्कार केला.