क्षीरसागर यांच्यासह सहा आमदारांची उमेदवारी पक्की, शिवसेनेचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 01:47 PM2019-09-13T13:47:49+5:302019-09-13T13:52:32+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरसह जिल्ह्यातील सहाही विद्यमान आमदारांची येत्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी शिवसेनेने निश्चित केली. या मतदारसंघातून त्यांनाच उमेदवारी ...

Six MLAs along with Kshirsagar are confirmed | क्षीरसागर यांच्यासह सहा आमदारांची उमेदवारी पक्की, शिवसेनेचा निर्णय

क्षीरसागर यांच्यासह सहा आमदारांची उमेदवारी पक्की, शिवसेनेचा निर्णय

googlenewsNext
ठळक मुद्देक्षीरसागर यांच्यासह सहा आमदारांची उमेदवारी पक्कीशिवसेनेचा निर्णय :चंदगड, कागलमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरसह जिल्ह्यातील सहाही विद्यमान आमदारांची येत्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी शिवसेनेने निश्चित केली. या मतदारसंघातून त्यांनाच उमेदवारी देण्याचे निश्चित असल्याने कुणाच्या मुलाखतीही झाल्या नाहीत. उर्वरित चारपैकी चंदगड व कागल मतदारसंघांतून उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच आहे.

कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांची उमेदवारी बदलणार, हा मतदारसंघ भाजप आपल्याकडे घेऊन तेथून पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे निवडणूक लढवणार अशी गेली अनेक दिवस चर्चा होती; परंतु तसा कोणताही बदल होणार नाही; कारण पक्षाने त्यांची उमेदवारी निश्चित केली आहे. या मतदारसंघातून जिल्हाप्रमुख संजय पवार हेदेखील इच्छुक होते; परंतु त्यांनाही पक्षाकडून आमदार क्षीरसागर यांच्या उमेदवारीबद्दल संकेत मिळाल्याने मुलाखत दिली नाही; तथापि त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक वाटचालीबद्दलचे एक पत्र पक्षनेतृत्वाला दिले.
त्यामध्ये मुख्यत: शहरातील पक्ष संघटनेत काय पद्धतीने राजकारण सुरू आहे याची माहिती दिली असल्याचे समजते.

अन्य कोणत्या मतदारसंघातील आमदारांची उमेदवारी बदलण्याची मागणी अथवा चर्चा नव्हतीच. त्यामुळे त्यांचाही मार्ग मोकळा झाला. उत्तर शिवाय करवीर मतदारसंघातून आमदार चंद्रदीप नरके, राधानगरीतून आमदार प्रकाश आबिटकर, शाहूवाडीतून आमदार सत्यजित पाटील, हातकणंगलेमधून आमदार डॉ. सुजित मिणचेकर आणि शिरोळमधून आमदार उल्हास पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली. त्याची पक्षाच्या वतीने येत्या काही दिवसांत अधिकृत घोषणा होईल.

मुंबईत बुधवारी शिवसेना भवनमध्ये पक्षाच्या वतीने इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पक्षाचे सचिव खासदार अनिल देसाई, खासदार डा.ॅ श्रीकांत शिंदे, विश्वनाथ नेरुडकर, अमोल कीर्तिकर आणि आमदार मनीषा तार्इंगडे यांनी या मुलाखती घेतल्या.

कागलमधून माजी आमदार संजय घाटगे यांनी मुलाखत देऊन या जागेवर शिवसेनेचाच हक्क असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवारास तब्बल एक लाख ४८ हजार मते मिळाली असून, या मतदारसंघातून पक्षाच्या उमेदवारास जिंकण्याची जास्त खात्री असल्याने हा मतदारसंघ शिवसेनेतर्फेच लढवावा, अशी मागणी घाटगे यांनी केली.

कुणी मागितली उमेदवारी

  • चंदगड : संग्राम कुपेकर, सुनील शिंत्रे, प्रभाकर खांडेकर, अनिरुद्ध रेडेकर, रियाज समंजी आणि विजय देवणे
  • कागल : संजय घाटगे, अंबरीश घाटगे, संभाजी भोकरे
  • कोल्हापूर दक्षिण : सुजित चव्हाण, राजू यादव व विराज पाटील
  • इचलकरंजी : महादेव गौड, नगरसेवक रवींद्र माने


देवणेही चंदगडमधून इच्छुक

गेल्या निवडणुकीत विजय देवणे हे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून लढले होते. यावेळेला हा मतदार संघ युतीमध्ये भाजपला जाणार हे माहीत असल्याने त्यांनी चंदगड मतदारसंघातून उमेदवारी मागितली. या मतदारसंघातून लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीपासून सातत्याने शिवसेनेला मताधिक्यांची चढती कमान आहे. त्यामुळे हा मतदार संघ शिवसेनेच्याच वाट्याला येणार हे नक्की समजून त्यांनी उमेदवारी मागितली आहे. राजेश नरसिंगराव पाटील यांनी उमेदवारीच न मागितल्याने ते शिवसेनेतून लढणार नाहीत, हे स्पष्ट झाले.
 

 

Web Title: Six MLAs along with Kshirsagar are confirmed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.