म्यूकरमायकोसिसचे नवे सहा रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:26 AM2021-05-27T04:26:18+5:302021-05-27T04:26:18+5:30

कोल्हापूर: म्यूकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढतच चालला असून, बुधवारी सकाळी आलेल्या अहवालानुसार आणखी सहाजण बाधित झाले आहे. ...

Six new patients with mucomycosis | म्यूकरमायकोसिसचे नवे सहा रुग्ण

म्यूकरमायकोसिसचे नवे सहा रुग्ण

Next

कोल्हापूर: म्यूकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढतच चालला असून, बुधवारी सकाळी आलेल्या अहवालानुसार आणखी सहाजण बाधित झाले आहे. बाधितांची संख्या ६२ वर पोहोचली आहे. त्यापैकी ४७ जण उपचार घेत आहेत, तर दहाजणांचा डिस्चार्ज करण्यात आला आहे. पाचजणांनी जीव गमावला आहे.

कोरोनाची साथ वाढली असताना म्युकरमायकोसिसने गेल्या आठवड्यात वेगाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. यावर विशेष उपचारही सुरू केले असून, आकडा वाढत असल्याने जनआरोग्य योजनेत याचा अंतर्भाव करून सर्वसामान्य रुग्णांना सरकारने दिलासा दिला आहे.

बुधवारी बाधित झालेले सहा रुग्ण हे एकट्या सीपीआरमधील आहेत. आजपर्यंत सीपीआरमध्ये २९, तर महापालिका क्षेत्रात २८ जण या आजाराने बाधित झाल्याचे आढळले आहे. करवीरमध्ये दोन, तर कागल, हातकणंगले, शिरोळ येेथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

Web Title: Six new patients with mucomycosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.