देशमुख बंधूंसह सहा पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

By admin | Published: April 21, 2017 12:46 AM2017-04-21T00:46:36+5:302017-04-21T00:46:36+5:30

बाळकृष्ण कदम, नितीन गोकावे यांचाही समावेश

Six police inspectors transferred with Deshmukh brothers | देशमुख बंधूंसह सहा पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

देशमुख बंधूंसह सहा पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

Next

कोल्हापूर : पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन वर्षे सेवा पूर्ण केलेल्या पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) राजकुमार व्हटकर यांनी गुरुवारी दिला. त्यानुसार कोल्हापूर जिल्"ातील सहा पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये पोलिस निरीक्षक अमृत देशमुख, अनिल देशमुख, बाळकृष्ण कदम आणि नितीन गोकावे, पद्मावती शिवाजीराव कदम, निर्मला माने-लोकरे यांचा समावेश आहे. राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख व लाचुलचपत प्रतिबंध विभागातील पोलिस निरीक्षक पद्मावती कदम यांची तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्र (सांगली) याठिकाणी, तर जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख यांची राज्य गुप्त वार्ता विभागाकडे बदली झाली आहे. त्याचबरोबर शिरोळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाळकृष्ण सीताराम कदम यांची आणि सध्या पोलिस मुख्यालयात असलेले नितीन गोकावे यांची मुंबई शहर तर जात पडताळणी विभागातील पोलिस निरीक्षक निर्मला माने-लोकरे यांची सांगली येथे बदली करण्यात आली आहे. दरम्यान, विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) व्हटकर यांच्या आदेशानुसार राज्यामध्ये २६७ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या शिवाय २११ या विनंती बदल्या आहेत. या अधिकाऱ्यांना १५ मे पर्यंत बदलीच्या ठिकाणी रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात. यापूर्वी पोलिस अधिकाऱ्यांना एकाच पोलिस ठाण्यात तीन वर्षे सेवा करण्याची मुदत होती; पण, गेल्या दोन वर्षांपासून राज्य शासनाने प्रत्येक पोलिस अधिकाऱ्यांचा कामाच्या ठिकाणाचा कार्यकाल हा दोन वर्षांचा केला आहे. (प्रतिनिधी) ...................................................................... देशमुख यांचा कार्यकाल पूर्ण राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख यांचा दोन वर्षांचा कार्यकाल गेल्यावर्षी पूर्ण झाला होता. मात्र, कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास त्यांच्याकडे होता. त्यामुळे पानसरे कुटुंबियांसह शहरातील विविध संघटनांनी देशमुख यांची बदली रद्द करावी,अशी मागणी केली होती. त्यामुळे त्यांना एक वर्ष मुदतवाढ मिळाली होती. ........................................................................... कोल्हापूरला तिघांच्या बदल्या या बदल्यांमध्ये गडचिरोलीचे पोलिस निरीक्षक संजय शिवाजीराव मोरे, पुणे शहर येथील पोलिस निरीक्षक सुनील दत्तात्रय पाटील आणि गुन्हे अन्वेषण विभागातील राजीव अनंत चव्हाण, यांची कोल्हापूरला बदली झाली आहे.

Web Title: Six police inspectors transferred with Deshmukh brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.