अकरावीसाठी तीन दिवसांत सहा हजार अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:27 AM2021-08-28T04:27:48+5:302021-08-28T04:27:48+5:30
गेल्या तीन दिवसांपूर्वी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडून ऑनलाईन अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी ...
गेल्या तीन दिवसांपूर्वी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडून ऑनलाईन अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी १८५०, दुसऱ्या दिवशी २६७६, तर तिसऱ्या दिवशी शुक्रवारी १७३७ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. त्यामध्ये सर्वाधिक अर्ज हे विज्ञान विद्याशाखेसाठी ३५३९ इतके आहेत. त्यापाठोपाठ वाणिज्य शाखेसाठी एकूण २०९८ अर्ज आहेत. तिसऱ्या दिवशी दाखल झालेल्या अर्जांची संख्या थोडी कमी झाली. नेटकॅफे आणि इंटरनेट सुविधा असलेल्या ठिकाणी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची तुरळक गर्दी दिसून आली. केंद्रीय समितीकडे दाखल होणाऱ्या अर्जांची दि. ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान छाननी केली जाणार आहे. त्यानंतर निवड यादी तयार करून दि. ७ सप्टेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया दि. ८ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
विद्याशाखानिहाय दाखल झालेले अर्ज
विज्ञान : ३५३९
वाणिज्य (मराठी) : १०५२
वाणिज्य (इंग्रजी) : १०४६
कला (मराठी) : ५९३
कला (इंग्रजी) : ४३