सैन्य भरतीत अखेरच्या दिवशी सहा हजार उमेदवारांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:55 PM2019-02-28T12:55:20+5:302019-02-28T12:59:36+5:30

कोल्हापूर : कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर प्रादेशिक सेनेतील शिपाई, लिपिक अशा पदांसाठी मैदानी निवड चाचणी मेळाव्याच्या बुधवारी अखेरच्या दिवशी सुमारे ...

Six thousand candidates appear on the last day of the military recruitment | सैन्य भरतीत अखेरच्या दिवशी सहा हजार उमेदवारांची हजेरी

सैन्य भरतीत अखेरच्या दिवशी सहा हजार उमेदवारांची हजेरी

Next
ठळक मुद्देसैन्य भरतीत अखेरच्या दिवशी सहा हजार उमेदवारांची हजेरीप्रादेशिक सेना भरती प्रक्रिया सुरू; तीन दिवसांत सुमारे ३0 हजार जणांची हजेरी

कोल्हापूर : कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर प्रादेशिक सेनेतील शिपाई, लिपिक अशा पदांसाठी मैदानी निवड चाचणी मेळाव्याच्या बुधवारी अखेरच्या दिवशी सुमारे सहा हजार उमेदवारांनी हजेरी लावली. तीन दिवसांमध्ये सुमारे ३0 हजार उमेदवारांनी भरती प्रक्रियेत हजेरी लावली.

कोल्हापूर येथील १०९ इन्फंट्री (टी. ए.) मराठा लाईट इन्फंट्री बटालियनतर्फे नियोजन केलेल्या भरती मेळाव्यात प्रादेशिक सैन्य भरतीसाठी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. मैदानी चाचणीमधून यशस्वी झालेल्या उमेदवारांचा २ मार्चपर्यंत कागदपत्रे तपासणी, मेडिकल तपासणी, अशी भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे.

बुधवारीही पहाटे पाच वाजल्यापासून भरती मेळाव्यास प्रारंभ झाला. धावणे, उंची व कागदपत्रांची तपासणी दिवसभर सुरूहोती. भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची कोणतीही गैरसोय होऊ नये. या उमेदवारांसाठी अनेक दानशूर व्यक्तींनी जेवण्याची व्यवस्था केली होती.
 

 

Web Title: Six thousand candidates appear on the last day of the military recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.