कागल तालुक्यात सहा हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:24 AM2021-07-27T04:24:18+5:302021-07-27T04:24:18+5:30
तालुक्यातील चिकोत्रा, दुधगंगा, वेदगंगा या नद्यांचे पाणी या अतिवृष्टीमुळे पात्राबाहेर पडले. मात्र, दुधगंगा आणि वेदगंगा नदीस महापूर येऊन नदीच्या ...
तालुक्यातील चिकोत्रा, दुधगंगा, वेदगंगा या नद्यांचे पाणी या अतिवृष्टीमुळे पात्राबाहेर पडले. मात्र, दुधगंगा आणि वेदगंगा नदीस महापूर येऊन नदीच्या जवळ असलेल्या गावांमध्ये पाणी शिरले. २०१९ मध्ये पूरबाधित झालेली गावे या वेळीही बाधित झाली. तालुक्यात प्रामुख्याने ऊसाचे पीक घेतले जाते. त्या पाठोपाठ यावर्षी सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली. परंतु जोरदार अतिवृष्टीमुळे तसेच पुराचे पाणी तुंबून राहिल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत. भुईमूग पेरणी उशीरा केलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुराने भाजीपाला आणि कडधान्ये पिकानांही फटका बसला आहे. अद्याप पूर्ण पाणी ओसरलेले नाही. त्यानंतरच नुकसानीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
कागलमध्ये उपनगरांचा संपर्क तुटला
अतिवृष्टीमुळे कागल शहरातील जयसिंगराव तलाव ओसंडून वाहत होता. सांडवे नुसते सुटलेच नाहीत तर त्यावरून पाणी वाहत होते. हे पाणी नागोबा ओढ्यात आल्याने ओढ्याकाठच्या आपार्टमेंटमध्ये पाणी घुसले होते. तसेच ओढ्याच्या या पाण्याने श्रमिक वसाहत, पिष्टे मळा, संकपाळ मळा या ठिकाणी जाणारा रस्ता बंद झाला होता.
२६ कागल
कागल तालुक्यात दुधगंगा नदीजवळील करनूर गावात पुराचे पाणी शिरले आहे.