आजऱ्यातील १६ गावांनी काेरोनाला रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:23 AM2021-04-07T04:23:49+5:302021-04-07T04:23:49+5:30

आजरा : आजरा तालुक्यातील १६ गावांमध्ये गेल्या दीड वर्षात कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. मुंबई, पुणे यासह बाहेरून आलेल्या नागरिकांचे ...

Sixteen villages in Ajra blocked Carona | आजऱ्यातील १६ गावांनी काेरोनाला रोखले

आजऱ्यातील १६ गावांनी काेरोनाला रोखले

Next

आजरा : आजरा तालुक्यातील १६ गावांमध्ये गेल्या दीड वर्षात कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. मुंबई, पुणे यासह बाहेरून आलेल्या नागरिकांचे शाळा व मंदिरात केलेले अलगीकरण, गावातील दैनंदिन स्वच्छता व प्रबोधन, मास्क व सॅनिटायझरचे मोफत वाटप यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव वेळेतच थांबविण्यात यश मिळाले आहे.

तालुक्यात ७४ महसुली गावे आहेत, तर लोकसंख्या एक लाख २० हजारांच्या दरम्यान आहे. दीड वर्षापूर्वी आलेल्या कोरोनाचे तालुक्यातील ४८ नागरिक बळी पडले आहेत, तर १०१९ जण कोरोनाचे पॉझिटिव्ह होते. तालुक्यात सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता; पण मुंबई, पुणे यासह अन्य ठिकाणांहून आलेल्या चाकरमान्यांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. किमान १० ते २०० पर्यंत गावागावांत पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. मात्र, उपचारानंतर ते बरे झाले.

लॉकडाऊनंतर आलेल्या नागरिकांना शाळा, देवालये, वसतिगृहात योग्य नियोजन करून अलगीकरण, गावातील स्वच्छता, मास्क व सॅनिटायझरचा वापर, संस्कार वाहिनीवरून दैनंदिन प्रबोधन, ५० वर्षांवरील नागरिकांना आयुर्वेदिक औषधांचा पुरवठा, दररोज तापमाप व ऑक्सिजन पातळी तपासणे याचे चांगले नियोजन केल्यामुळे १६ गावांना कोरोनाला वेशीतच रोखणे शक्य झाले. कोरोनाविना असलेल्या १६ गावांत चाकरमानी कोरोना काळात जवळपास ३० ते ३५ टक्के आले. अनेक चाकरमानी शेतातील घरातच राहिले. गणपती, दिवाळी, होळीसह अन्य सणासाठी आलेल्या चाकरमान्यांपासून ग्रामस्थांनी सुरक्षितता घेतली. अशा चाकरमान्यांना सात दिवस अलगीकरणात ठेवले. त्यांना घरातून बाहेर पडण्यावर निर्बंध घातले. त्यामुळे १६ गावांना कोरोना रोखण्यात यश आले.

--------------------------

*

कोरोनाविना १६ गावे व त्यांची लोकसंख्या कंसात

* कोरीवडे (८६१), कागीनवाडी (२७८), सावरवाडी (१२३), यमेकोंड (७११), जेऊर (४०२), भावेवाडी (४९२), महागोंडवाडी (३५९), मोरेवाडी (४७३), खानापूर (७८१), पेढेवाडी (१४४), शेळप (७२५), देऊळवाडी (२६५), सातेवाडी (२४१), सुळेरान (१२०७), आंबाडे (५०४), किटवडे (९७४) --------------------------

कोरोना रोखण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने केलेले योग्य नियोजन, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन यामुळेच कोरोनाचा शिरकाव थोपवू शकलो.

- नंदा शंकर पोतनीस, सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत देऊळवाडी-सातेवाडी.

--------------------------

Web Title: Sixteen villages in Ajra blocked Carona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.