कुंभारवाडी ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:43 AM2021-02-18T04:43:33+5:302021-02-18T04:43:33+5:30
या ग्रामपंचायतीच्या वतीने सन २०१९-२०२० मध्ये केलेल्या स्वच्छता, पाणीपुरवठा, पर्यावरण संवर्धन, आदींसह महत्त्वाच्या विविध विकासकामांची दखल घेऊन ...
या ग्रामपंचायतीच्या वतीने सन २०१९-२०२० मध्ये केलेल्या स्वच्छता, पाणीपुरवठा, पर्यावरण संवर्धन, आदींसह महत्त्वाच्या विविध विकासकामांची दखल घेऊन जिल्हा परिषदेत झालेल्या सोहळ्यात आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत स्व. आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम पुरस्कार देऊन सरपंच स्वप्नाली दीपक कुंभार, ग्रामसेवक रमेश तायशेटे, दीपक कुंभार, उपसरपंच अर्चना कुंभार, ग्रामपंचायत सदस्य सातापा पाटील, कोमल कुंभार, मंगल मालप, सुनील पाटील, मनीषा पाटील, सुरेश कुंभार, कर्मचारी गोविंदा पोवार, मोहन र्हाटवळ यांना गौरविण्यात आले.
पुरस्कार वितरण प्रसंगी जि. प. सदस्य पांडुरंग भांदिगरे, पं. स. सभापती मोहन पाटील. पं. स. सदस्य दीपक पाटील, गटविकास अधिकारी डॉ. संदीप भंडारी, विस्तार अधिकारी आर. एम. जमदाडे, आर. बी. जंगम, एन. आर. साबळे, ग्रामसेवक संघाचे सदस्य सागर सरावणे, एल. एस. इंगळे, बंडोपंत पाटील, दिलीप कदम, नीळकंठ चव्हाण उपस्थित होते.
सोबत फोटो
फोटो कॅप्शन : स्व. आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम पुरस्कार वितरणप्रसंगी मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, बजरंग पाटील, सतीश पाटील, पांडुरंग भांदिगरे, स्वप्नाली कुंभार, रमेश तायशेटे, दीपक कुंभार, दीपक पाटील, साताप्पा पाटील, आदी उपस्थित होते.