धामोड परिसरात परतीच्या पावसाचे धुमशान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 04:39 PM2020-10-20T16:39:33+5:302020-10-20T16:42:19+5:30

rain, dhamod, kolhapur, farmar दुपारी एक वाजता अचानक सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटाने चांगलीच धडकी भरली होती.

Smoke of return rain in Dhamod area | धामोड परिसरात परतीच्या पावसाचे धुमशान

धामोड( ता. राधानगरी) येथे परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. (छाया-श्रीकांत ऱ्हायकर)

Next
ठळक मुद्देधामोड परिसरात परतीच्या पावसाचे धुमशान४५ मिनीटात विक्रमी १००मिली मीटर पाऊस

धामोड- दुपारी एक वाजता अचानक सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटाने चांगलीच धडकी भरली होती.

अचानक सुरू झालेल्या पावसाने भात कापणी व मळणीच्या कामात मोठे अडथळे निर्माण झाले .४५ मिनीटे एक सारखा हा पाऊस कोसळत होता . या ४५ मिनीटात धामोड परिसरात विक्रमी १००मिली मीटर इतका पाऊस झाला.

या परतीच्या पावसाने भात पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक सुरू झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. रस्त्यावर घाललेल्या भात मळण्यांचे तर मोठा नुकसान झाले. दरम्यान तुळशी धरणाच्या पाणी पातळीत ही मोठी वाढ झाल्याने धरणातून ७५० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले.

 

Web Title: Smoke of return rain in Dhamod area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.