स्मृतिग्रंथ हा मोहन बुडके यांच्या कार्याला उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:27 AM2021-08-24T04:27:32+5:302021-08-24T04:27:32+5:30
मोहन बुडके यांचा पहिला स्मृतिदिन आणि बुडके यांच्या कार्यावरील विशेषांकाचे प्रकाशन बुधवारी, दि. २५ सकाळी १०.३० वाजता येथील महादेव ...
मोहन बुडके यांचा पहिला स्मृतिदिन आणि बुडके यांच्या कार्यावरील विशेषांकाचे प्रकाशन बुधवारी, दि. २५ सकाळी १०.३० वाजता येथील महादेव मंदिर सांस्कृतिक भवनात होणार आहे. त्यानिमित्त शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, माजी नगराध्यक्ष प्रवीण भाटले- सडोलकर, माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, गणी पटेल, अस्लम शिकलगार, प्रकाश बाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रा. डॉ. अच्युत माने म्हणाले, कोणत्याही प्रकारचा भेदभाव न ठेवता सर्व जातीधर्मातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी मोहन बुडके यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या निधनामुळे समाजात पोकळी निर्माण झाली आहे.
माजी आमदार प्रा. सुभाष जोशी म्हणाले की, सहकार, राजकीय शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे कार्य मोठे आहे. महाराष्ट्राच्या महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या संघटना उभारणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. संघटनेचे सचिव म्हणून त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन हा बैठकीत करण्यात आले आहे.
फोटो : मोहन बुडके