शाहूवाडी तालुक्यात गौण खनिजाची लूट

By admin | Published: January 2, 2017 12:26 AM2017-01-02T00:26:34+5:302017-01-02T00:26:34+5:30

कारवाईची मागणी : खनिज विभागाच्या मूक संमतीने बॉक्साईटचे उत्खनन

Smuggling of minor minerals in Shahuwadi taluka | शाहूवाडी तालुक्यात गौण खनिजाची लूट

शाहूवाडी तालुक्यात गौण खनिजाची लूट

Next

मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात गौण खनिजाची राजरोस लूट केली जात आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी गौण खनिजाची लूट करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. शाहूवाडी तालुक्याला निसर्गाने खनिज संपत्तीची भरपूर देणगी दिली आहे. तालुक्यात १३१ गावे, २५० वाड्या-वस्त्यांतून तालुका विभागला आहे. तालुक्याच्या अनेक गावातील मातीमध्ये बॉक्साईटसह अन्य खनिजे आढळून येतात.
खनिज विभागाच्या संमतीने बॉक्साईटची लूट केली जात असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. दोन वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी बॉक्साईटच्या भरलेल्या ट्रकच्या पासची चौकशी केली असता पास मिळून आला नाही. त्यामुळे स्वाती मिनरल कंपनीवर कारवाई करून बंद करण्यात आली. सध्या कासार्डे, ऐनवाडी, धनगरवाडी, मिरगाव, धनगरवाडा, रिंगेवाडी, मानोली आदी गावांच्या हद्दीतील गावांत बॉक्साईटचे उत्खनन सुरू आहे. या कंपनीने नियम धाब्यावर बसवून उत्खनन सुरू केले आहे. तर बेकायदा वृक्षतोड सुरू आहे.
जंगलाच्या जवळ नियमांची पायमल्ली केली जात आहे. तर शाहूवाडी, आंबा, बांबवडे, करंजफेण, शित्तूर-वारुण, आदी गावांत खासगी ठेकेदार रात्री मुरुमाची राजरोसपणे लूट करीत आहेत. या गौणखनिजाची वाहतूक रॉयल्टी बुडवून शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी वाहतूक केली जाते. दगडाची देखील वाहतूक सुरू आहे. मात्र, स्थानिक शेतकऱ्यांना नाहक त्रास महसूल विभागाकडून दिला जात आहे. घरबांधणीसाठी शेतकरी घरासाठी जागा
करण्यासाठी मुरुमाचे उत्खनन करतो, मात्र, खनिजाचे उत्खनन करून
विक्री करणारे मोकाट आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची
मागणी नागरिकांतून होत
आहे.
खनिज संपत्तीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे खनिज संपत्तीची विक्री केली जात आहे. महसूल विभागाच्या पथकाने रात्री गस्त वाढवून खनिज चोरांवर कारवाई करावी.
शेतकऱ्यांना नाहक त्रास
घरबांधणीसाठी मुरुमाचे उत्खनन करणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांना महसूल विभागाकडून नाहक त्रास दिला जात आहे. मात्र, खनिजाचे उत्खनन करून विक्री करणारे मोकाट आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

Web Title: Smuggling of minor minerals in Shahuwadi taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.