कोल्हापूरच्या स्नेहल बेंडके आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलच्या समन्वयक, फिबाच्या तांत्रिक प्रतिनिधी म्हणून एकमेव महिला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 05:39 PM2022-12-16T17:39:47+5:302022-12-16T17:40:53+5:30

फिबा या जागतिक बास्केटबॉल संघटनेमार्फत आशिया खंडांतर्गत अकरा देशांचा समावेश असलेल्या सर्वोच्च व्यावसायिक क्लबसाठी फिबा डब्लूएएसएल लीग स्पर्धा

Snehal Bendke International Basketball Coordinator of Kolhapur | कोल्हापूरच्या स्नेहल बेंडके आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलच्या समन्वयक, फिबाच्या तांत्रिक प्रतिनिधी म्हणून एकमेव महिला

कोल्हापूरच्या स्नेहल बेंडके आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलच्या समन्वयक, फिबाच्या तांत्रिक प्रतिनिधी म्हणून एकमेव महिला

googlenewsNext

कोल्हापूर : फिबा या जागतिक बास्केटबॉल संघटनेमार्फत आशिया खंडांतर्गत अकरा देशांचा समावेश असलेल्या सर्वोच्च व्यावसायिक क्लबसाठी फिबा डब्लूएएसएल लीग स्पर्धा सोमवारपासून सुरू होत आहे. यासाठी फिबाच्या तांत्रिक प्रतिनिधी म्हणून कोल्हापूरच्या स्नेहल बेंडके या बास्केटबॉलपटूची निवड झाली आहे. आठ देशांच्या फिबा तांत्रिक प्रतिनिधी म्हणून बेंडके या एकमेव महिला समन्वयक असून आशिया खंडातील देशांमधून निवड झालेल्या त्या एकमेव आहेत, अशी माहिती बेंडके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

फिबा डब्लूएएसएल लीगसाठी निवड झालेल्या समन्वयकांची ५ आणि ६ डिसेंबर रोजी बैरुत लेबनॉन येथील फिबाच्या आशियाई मुख्यालयात कार्यशाळेमार्फत प्रशिक्षण देण्यात आले. उद्या, १७ डिसेंबर रोजी पहिल्या फिबा डब्लूएएसएल लीग २०२२-२३ साठी स्नेहल बेंडके बैरुत लेबनॉनसाठी रवाना होत आहेत. स्नेहल यांची यापूर्वी लेबनॉन आणि कझाकिस्तान येते फिबा पुरुषांच्या विश्वचषक क्वालिफायर गेम २०२३ च्या विंडो तीन आणि विंडो चारसाठी निवड झाली होती. या पत्रकार परिषदेत वंदना पाटील, वर्षा जोशी, नारायण पाटील, इंद्रजित घोरपडे, अजिंक्य बेले, उदय पाटील, रोहित घेवारे यांचा सत्कार करण्यात आला.

अकरा देशांच्या १६ क्लबचा समावेश

या स्पर्धेत पश्चिम आशिया आणि गल्फ आशिया या दोन गटांत ११ देशांतील आघाडीच्या सोळा बास्केटबॉल व्यावसायिक क्लबचा समावेश असणार आहे. ही स्पर्धा १९ डिसेंबरपासून मे २०२३ पर्यंत चालणार आहे. होम ॲन्ड अवे पद्धतीने घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण आशिया आणि मध्य आशिया सबझोनधून भारत आणि कझाकिस्तान या दोन संघांना थेट प्रवेश मिळाला आहे

Web Title: Snehal Bendke International Basketball Coordinator of Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.