'ते' पक्षाचा अपमान करीत आहेत की काय?, मंत्री मुश्रीफांचा घाटगेंना खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 12:23 PM2023-07-08T12:23:31+5:302023-07-08T12:23:56+5:30

सरसेनापतीला युद्धनीती, डावपेच माहीत असतात

So are they defaming the party or what?, Minister Hasan Mushrif Challenging question to Samarjit Ghatge | 'ते' पक्षाचा अपमान करीत आहेत की काय?, मंत्री मुश्रीफांचा घाटगेंना खोचक सवाल

'ते' पक्षाचा अपमान करीत आहेत की काय?, मंत्री मुश्रीफांचा घाटगेंना खोचक सवाल

googlenewsNext

कागल : मंत्री हसन मुश्रीफ हे लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांचे सरसेनापती होते. सरसेनापतीला युद्धनीती, डावपेच माहीत असतात. महत्त्वाचे म्हणजे चक्रव्यूहातून बाहेर कसे पडायचे, हे माहीत असायला हवे असते. मंत्री मुश्रीफ यांना हे जमले आहे. ते जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आहेत. आता त्यांनी आम्ही असू अथवा समरजित घाटगे असूदेत आम्हा सर्वांना बरोबर घेऊन जावे. आमचे पालकत्व निभवावे, असे प्रतिपादन खासदार संजय मंडलिक यांनी केले.

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच माजी आमदार संजय घाटगे पराभूत होऊनही मुश्रीफांच्या सत्काराला गैबी चौकात हजर राहिले होते. आज मात्र बदलत्या राजकीय घडामोडीने खा. मंडलिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आजची सभा विधानसभेच्या निवडणुकीची सभा आहे का, अशी भाषणे झाली; पण शेवटी कार्यकर्ता जगण्यासाठी राजकीय ईर्षा हवीच. आमची आणि मंत्री मुश्रीफांची जिल्हा परिषद निवडणुकीपासून एकत्र सुरुवात आहे. वरची राजकीय स्थिती काहीही असली तरी आम्ही विकासकामाच्या विषयावर एकत्रच राहिलो आहोत. आता आम्ही महायुतीचे घटक बनलो आहोत. दुप्पट वेगाने जिल्ह्याचा विकास करू, असेही मंडलिक म्हणाले.

ते पक्षाची बदनामी करीत आहेत. मंत्री मुश्रीफ

दरम्यान सत्कार सोहळा झाल्यानंतर पत्रकारांनी समरजित घाटगे यांच्या भूमिकेबद्दल विचारले तेव्हा मंत्री मुश्रीफ म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे अध्यक्ष अमित शहा, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांनी चर्चा करून हे महायुतीचे सरकार बनविले आहे. मग समरजित घाटगे हे स्वतः जिल्हाध्यक्ष असूनही आपल्या वरिष्ठ नेत्यांची बदनामी कशी काय करीत आहेत.

Web Title: So are they defaming the party or what?, Minister Hasan Mushrif Challenging question to Samarjit Ghatge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.