..तर मी कोणतीही शिक्षा भोगण्यास तयार - हसन मुश्रीफ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 01:45 PM2023-01-20T13:45:55+5:302023-01-20T13:46:32+5:30

केंद्रात आणि राज्यात तुमची सत्ता. कोणत्याही यंत्रणेकडून चौकशी करा

So I am ready to suffer any punishment, NCP MLA Hassan Mushrif reaction on ED raid case | ..तर मी कोणतीही शिक्षा भोगण्यास तयार - हसन मुश्रीफ

संग्रहीत फोटो

googlenewsNext

कागल : माझा जावई एमआयडीसीतील छोटा कारखानदार आहे. ब्रिक्स कंपनी किंवा आरोप केले जात असलेल्या जीएसटी सल्लागार कंपनीशी त्याचा कोणताही संबंध नाही. फक्त मुश्रीफांची जनमानसातील प्रतिमा मलिन करण्यासाठी त्याला बदनाम केले जात आहे. आज केंद्रात आणि राज्यात तुमची सत्ता आहे. तुम्ही कोणत्याही यंत्रणेकडून चौकशी करा. माझा जावई यात कोठे आढळला तर मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे; पण ज्यांचा कोठे संबध नाही अशा कुटुंबावर नाहक शिंतोडे उडवू नका, असे आवाहन माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.

किरीट सोमय्या यांच्या विरुद्ध कोल्हापूर न्यायालयात दीड कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा सुरू आहे. ते पुढील तारखा घेत आहेत, असेही मुश्रीफ म्हणाले. कागल येथे पत्रकारांशी ते बोलत होते. माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्यावर तर ते केवळ माझे जवळचे कार्यकर्ते आहेत म्हणूनच छापा टाकण्यात आला. हे माझ्यासाठी वेदनादायी आहे.

ईडी, आयकर आणि आरओसी म्हणजे रजिस्ट्रार ऑफ कंपनी अशा तीन केंद्रीय यंत्रणांकडून आमच्यावर व सरसेनापती साखर कारखान्यावर तीन वेळा छापा टाकला आहे. आरओसीच्या कारवाई विरुद्ध आम्ही उच्च न्यायालयात गेलो आहोत. तेथे स्थगितीही मिळाली आहे.

सरसेनापती साखर कारखाना हजारो शेतकऱ्यांनी दिलेल्या पैशातून उभारला आहे. आमची कौटुंबिक मालमत्ता बॅंकांना तारण देऊन कर्ज उभारणी केली आहे. पत्रकार परिषदेवेळी भय्या माने, युवराज पाटील, चंद्रकांत गवळी, प्रवीण काळबर, नेताजी मोरे, संदीप भुरले, विवेक लोटे उपस्थित होते.

व्यवहारच नाही तर घोटाळा कसा ?

ग्रामपंचायतीसाठी जीएसटीसंदर्भात एकसूत्रता व कमी खर्चात सल्लागार मिळावा म्हणून अनेकांनी केलेल्या सूचनेनुसार राज्यपातळीवर एकच एजन्सी नेमण्याचा निर्णय ग्रामविकास मंत्री म्हणून जरूर घेतला; पण यातील त्रुटी लक्षात आल्यावर कोणतीही एजन्सी न नेमता तो निर्णय रद्दही केला. यात एक पैशाचा व्यवहार झाला नाही, मग यात पंधराशे कोटींचा घोटाळा कोठे व कसा झाला? तेच तेच आरोप करून दिशाभूल केली जात आहे.

Web Title: So I am ready to suffer any punishment, NCP MLA Hassan Mushrif reaction on ED raid case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.