इसलिए राह संघर्ष की हम चलें...!
By admin | Published: October 21, 2015 12:39 AM2015-10-21T00:39:38+5:302015-10-21T00:39:53+5:30
पानसरे स्मृती मॉर्निंग वॉक : मारेकऱ्यांमागील खऱ्या सूत्रधारांना शोधण्याची मागणी
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांमागे असणाऱ्या खऱ्या सूत्रधारांचा शोध लागावा, या मागणीसाठी मंगळवारी सकाळी सम्राटनगर, शिवाजी विद्यापीठ परिसरात ‘मॉर्निंग वॉक’ काढण्यात आला. यावेळी
इसलिए राह संघर्ष की हम चलें जिंदगी आसूओं में नहाई न हो शाम सहमी न हो रात हो ना डरी भोर की आँख फिर, डबडबाई ना हो असा संदेश देत विविध स्तरांतील मान्यवर सहभागी झाले.गोविंद पानसरे यांच्या निवासस्थानापासून सुरू झालेल्या या निषेध फेरीमध्ये हातांमध्ये ‘लडेंगे जितेंगे’ अशी ‘ गोविंद पानसरे यांच्यावरील खुनी हल्ल्याचा निषेध’ अशा आशयाची पोस्टर घेऊन सहभागी झाले. विद्यापीठाच्या परीक्षा भवनाच्या कट्ट्यावर फिरून आल्यावर पानसरे थोडा वेळ बसत असत. त्या ठिकाणी संघसेन जगतकर, रसिया पडळकर, कृष्णात कोरे यांनी ‘इसलिए राह संघर्ष की’ या जागर गीतामधील ‘सूर पर बादलों का न पहारा रहे, रोशनी रोशनाई में डुबी न हो, यू ना ईमान फूटपाथ पर हो खडा, हम समय आत्मा सबकी उबी न हो, आसमाँ में टंगी हो ना खुशहालियाँ, कैद महलों में सबकी कमाई न हो’ हे जागर गीतही गायले. यावेळी सर्वांनी ‘कॉम्रेड गोविंद पानसरे अमर रहे, अमर रहे’
अशा घोषणा देऊन ‘आगे और लडाई है’ असा नारा देत पुन्हा वॉक सुरू केला. सम्राटनगर येथे हुतात्मा स्मारक येथे या मॉर्निंग वॉकचा समारोप झाला.
त्यामध्ये मेघा पानसरे, सुरेश शिपूरकर, दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, दिलीप पवार, उदय नारकर, प्रा. रणधीर शिंदे, एम. बी. पडवळे, सीमा पाटील, आर्किटेक्ट जीवन बोडके, धनाजी जाधव, उमेश पानसरे,धनाजी जाधव, सतीश पाटील, अरुण पाटील, आदीं सहभागी झाले. (प्रतिनिधी)
ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांच्या खऱ्या सूत्रधाराचा शोध लागावा, या मागणीसाठी पानसरे रोज मॉर्निंग वॉकला ज्या मार्गावरून जात होते, त्या मार्गावरून कोल्हापुरात मंगळवारी निषेध फेरी काढण्यात आली.