...तर तुम्हालाही धोक्यात आणू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:24 AM2021-09-03T04:24:44+5:302021-09-03T04:24:44+5:30
शिये : महापुराला आळा घालण्यासाठी शहरातील नदीकाठांवर भिंत बांधून सरकार ग्रामीण लोकांचा जीव धोक्यात घालणार असेल तर, तुम्हालाही धोक्यात ...
शिये : महापुराला आळा घालण्यासाठी शहरातील नदीकाठांवर भिंत बांधून सरकार ग्रामीण लोकांचा जीव धोक्यात घालणार असेल तर, तुम्हालाही धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. पूरग्रस्तांना भरीव मदत देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने काढण्यात आलेली जनआक्रोश पदयात्रा बुधवारी सायंकाळी शिये (ता. करवीर) येथे आली. या वेळी आयोजित सभेत ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, केंद्र व राज्य सरकार तांत्रिक बाबींचे कारण सांगत शेतकऱ्यांना मदत देण्याचे लांबवत आहेत. केंद्र सरकार महाराष्ट्राबद्दल दुजाभाव करत असून राज्यात मोठा पूर आला असतानाही केंद्रीय समितीने यांची पाहणी केली नाही. याऊलट गुजरातमध्ये त्यांनी पाहणी केल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. या वेळी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील, विक्रम पाटील, जनार्दन पाटील, शिये सरपंच रेखा जाधव, कृष्णात चौगले, वैभव कांबळे, शिवराम गाडवे, प्रभाकर काशिद, मच्छिंद्र मगदूम, जयसिंग पाटील, किरण जाधव, किरण चौगले, विलास गुरव उपस्थित होते.
फोटो
: ०२ शिये सभा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पूरग्रस्तांसाठी काढण्यात आलेली जनआक्रोश पदयात्रा बुधवारी शिये येथे आली. या वेळी आयोजित सभेत माजी खासदार राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले.