कोविड वार्डवर हल्ला रुग्णवाहिका जाळल्या प्रकरणी इतके जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 01:38 PM2020-07-23T13:38:39+5:302020-07-23T13:39:56+5:30

बेळगाव जिल्हा रुग्णालयासमोर जमावाने रुग्ण वाहिका पेटवून समोर थांबलेल्या कारची मोडतोड आणि बिम्स इस्पितळावर दगडफेक करून कोविड वार्ड वर हल्ला केल्या प्रकरणी बेळगाव पोलिसांनी कारवाईस प्रारंभ केला आहे. ए पी एम सी पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी करायला सुरुवात केली आहे.

So many people arrested in case of burning of ambulance attack on Kovid ward | कोविड वार्डवर हल्ला रुग्णवाहिका जाळल्या प्रकरणी इतके जण ताब्यात

कोविड वार्डवर हल्ला रुग्णवाहिका जाळल्या प्रकरणी इतके जण ताब्यात

Next
ठळक मुद्देकोविड वार्डवर हल्ला रुग्णवाहिका जाळल्या प्रकरणी इतके जण ताब्यातबेळगाव पोलिसांकडून कारवाईस प्रारंभ

बेळगाव -जिल्हा रुग्णालयासमोर जमावाने रुग्ण वाहिका पेटवून समोर थांबलेल्या कारची मोडतोड आणि बिम्स इस्पितळावर दगडफेक करून कोविड वार्ड वर हल्ला केल्या प्रकरणी बेळगावपोलिसांनी कारवाईस प्रारंभ केला आहे. ए पी एम सी पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी करायला सुरुवात केली आहे.

बुधवारी रात्री सव्वा नऊच्या दरम्यान हा प्रकार घडला होता त्या नंतर लागलीच जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी बिम्स इस्पितळाला भेट देऊन पहाणी केली होती व शासकीय मालमत्तेचे नुकसान केलेल्यांची गय केली जाणार नाही कठोर कारवाईचा इशारा दिला होता.

काल रात्री जमावाने केलेल्या हल्ल्यात एकूण पाच जण जखमी झाले असून एक रुग्णवाहिका पूर्णपणे जळून खाक झाली आहे तर दगडफेकीत पोलीस वाहनांसह पाच वाहनांचे नुकसान झाले आहे.

घटनास्थळी दाखल झालेल्या ए पी एम सी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून चौकशीस प्रारंभ केला आहे.रात्रभर ए पी एम सी पोलिसांनी हिंसाचाराला जबाबदार असलेल्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे अनेक जणांना ताब्यात घेण्यात येत आहे.


प्रादेशिक आयुक्त अमलान बिश्वास यांना मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पां यांनी घटनेचा अहवाल देण्याची सूचना केली होती त्या नुसार प्रादेशिक आयुक्तांनी रात्रीच बिम्स अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे सर्व माहिती घेतली आहे.पोलीस आयुक्त जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रात्रीच बिम्सला भेट देत डॉक्टर आणि नर्सचे चर्चा करत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा विश्वास देण्याचा प्रयत्न केला होता.

बिम्स आणि जिल्हा रुग्णालय परिसरात 144 कलम लागू करण्यात आला आहे.

Web Title: So many people arrested in case of burning of ambulance attack on Kovid ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.