...तर एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:32 AM2021-06-16T04:32:35+5:302021-06-16T04:32:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : कोल्हापूर दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्या गाड्या अडविण्याच्या प्रयत्नात असलेल्या येथील मराठा समाजातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कोल्हापूर दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्या गाड्या अडविण्याच्या प्रयत्नात असलेल्या येथील मराठा समाजातील कार्यकर्त्यांची पोलिसांनी समजूत काढत आंदोलन रोखले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे समाजाच्यावतीने जोरदार निदर्शने करत घोषणाबाजी करण्यात आली. शहरात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही, असा इशारा दिला.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या व मृत्युसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सोमवारी जिल्हा दौऱ्यावर आले होते. दोन्ही मंत्री येथील आयजीएम रुग्णालयास भेट देणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांना समजली. त्यानुसार कार्यकर्ते कोल्हापूरला मोटारसायकलवरून जाऊन रास्ता रोको करणार असल्याचे पोलिसांना समजले. त्यामुळे पोलिसांनी त्यांची समजूत काढून त्यांना इचलकरंजीतच रोखले. या वेळी पै. अमृत भोसले, किसन शिंदे, संतोष शेळके, शशिकांत मोहिते आदी उपस्थित होते.
फोटो ओळी
१४०६२०२१-आयसीएच-०३
इचलकरंजीत मराठा समाजाच्यावतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.