महाडिक भ्याले म्हणता, तर दारात आल्यावर बाहेर का आला नाही?, अमल महाडिकांचा सतेज पाटलांवर पलटवार 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 12:23 PM2023-04-11T12:23:51+5:302023-04-11T12:25:13+5:30

सभासदच त्यांचा कंडका पाडतील

So why didn't he come out when he came in the door, Amal Mahadik counter attack on Satej Patil | महाडिक भ्याले म्हणता, तर दारात आल्यावर बाहेर का आला नाही?, अमल महाडिकांचा सतेज पाटलांवर पलटवार 

महाडिक भ्याले म्हणता, तर दारात आल्यावर बाहेर का आला नाही?, अमल महाडिकांचा सतेज पाटलांवर पलटवार 

googlenewsNext

काेल्हापूर : महादेवराव महाडिक यांना कसबा बावड्यात फिरू देणार नसल्याचे वक्तव्य करणाऱ्या सतेज पाटील यांच्या दारात गेल्यानंतर ते बाहेर आले नाहीत. महाडिक भ्याले होते तर मग घरातून बाहेर का बाहेर आला नाही?, ज्यांच्या राजकारणाची सुरुवात माझ्या वडिलांच्या गाडीचे दार उघडण्यापासून झाली, त्यांना काय घाबरायचे?, आम्ही रडणारे नाही, लढणारे आहोत, समाेरासमाेर लढू, असा पलटवार माजी आमदार अमल महाडिक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

अमल महाडिक म्हणाले, महादेवराव महाडिक यांच्या विचाराने, विश्वासाने तुम्ही पहिली विधानसभा जिंकला. त्यावेळी ते येलूर, पंढरपूरचे आहेत, हे समजले नव्हते का?, सहकारातील देव चोरल्याची वल्गना करणारे शेतकऱ्यांचे सभासदत्व रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले कसे?, त्यांना सहकार टिकवायचा की मोडायचा आहे, हे लक्षात येते.

सर्जेराव माने यांनी चारवेळा गट बदलला, महादेवराव महाडिक यांनी सगळे विसरून सोबत घेतले. संचालक, अध्यक्ष होता मग तुम्हाला पोटनियमाची माहिती कशी नव्हती?, आमचा कारभार पसंत नव्हता, एवढेच स्वाभिमानी होता तर राजीनामा का दिला नाही?, असा सवाल महाडिक यांनी केला.

तुलना आमच्या कारखान्याची करता, डी. वाय. चे बोलावे, बावड्यातील सभासद मांडुकली गावातील आहेत, बारा वर्षात को जनरेशन असूनही दर दिला. गुऱ्हाळघर क्षेत्रातील कारखाना आहे,

वैर तुमचे आमचे...

महादेवराव महाडिक यांच्या गाडीचे दार उघडणारे सतेज पाटील तोल गेल्यासारखे बाेलत आहेत. वैर तुमचे आमचे आहे, त्यात इतरांना घेऊन पडू नका, असा इशाराही महाडिक यांनी दिला.

रडीचा डाव पहिल्यांदा तुम्हीच खेळला

आमच्यावर रडीच्या डावाचा आरोप करणाऱ्यांनी १८९९ सभासदांवर हरकत घेतली, त्यावेळीच रडीचा डाव खेळला. सुरुवातीला भूमिका मांडण्यास आम्ही कमी पडलो, मात्र शेवटी न्यायदेवतेने त्या सभासदांना न्याय दिल्याचे महाडिक यांनी सांगितले.

तुमच्या कारभाराची तुलना करावीच लागेल

उपपदार्थाशिवाय ‘राजाराम’ कारखाना शेतकऱ्यांना २९०० रुपये दर देतो. आमच्या कारभारावर बोलता त्यावेळी तुमच्या कारभाराचा हिशोब मांडावाच लागेल. तुमच्या डी. वाय. पाटील कारखान्यात बावड्यातील सभासद मांडुकली गावात कसे गेले?, असा सवाल महाडिक यांनी केला.

मग, महाविकास आघाडी सोबत का 

भाजप शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकत नाही, ते कायद्यानुसारच काम करत आहेत. शेतकरी हा सर्वपक्षीय आहे, तुम्हीच महाविकास आघाडीसह ‘गोकुळ’, जिल्हा बँक यंत्रणेचा व डी. वाय. पाटील ग्रुपच्या कर्मचाऱ्यांचा वापर करत पक्षीय पातळीवर निवडणूक नेल्याचा आरोप महाडिक यांनी केला.

Web Title: So why didn't he come out when he came in the door, Amal Mahadik counter attack on Satej Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.