कोरोना महामारी रोखण्यासाठी समाजप्रबोधन महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:17 AM2021-06-26T04:17:47+5:302021-06-26T04:17:47+5:30

कोपार्डे : कोरोना महामारी रोखण्यासाठी लोकचळवळ व समाजप्रबोधन महत्त्वाचे असून, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने ...

Social awareness is important to prevent the corona epidemic | कोरोना महामारी रोखण्यासाठी समाजप्रबोधन महत्त्वाचे

कोरोना महामारी रोखण्यासाठी समाजप्रबोधन महत्त्वाचे

Next

कोपार्डे : कोरोना महामारी रोखण्यासाठी लोकचळवळ व समाजप्रबोधन महत्त्वाचे असून, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा, अशी सूचना आ. प्रा. जयंत आसगावकर यांनी केली.

वाकरे (ता. करवीर) येथे विलगीकरण कक्ष उद्घाटन, ग्रामपंचायतीस रुग्णवाहिका प्रदान व स. ब. खाडे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने कोरोना जनजागृती उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार आसगावकर बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच वसंत तोडकर होते.

आमदार आसगावकर यांनी गाव तलावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणे, तलाव पर्यटन स्थळ आणि ऑक्सिजन पार्क निर्मिती करणे यासाठी शासनस्तरावर निधीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. वाकरेचे सरपंच वसंत तोडकर व कुंभीचे संचालक संजय पाटील यांच्या आर्थिक मदतीने ग्रामपंचायतीस रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. यावेळी

करवीर पंचायत समिती उपसभापती अविनाश पाटील, उपसरपंच शारदा पाटील, कुंभी कासारीचे संचालक संजय पाटील, यशवंत बँक संचालक संग्राम भापकर, कुंडलिक पाटील, संजय डी. पाटील, जि. प. सदस्य सुभाष सातपुते, दीपक माने, प्राचार्य डॉ. डी. डी.कुरळपकर उपस्थित होते.

फोटो

: २५ वाकरे रुग्णवाहिका

वाकरे (ता. करवीर) येथे सरपंच वसंत तोडकर व कुंभीचे संचालक यांच्या आर्थिक मदतीने रुग्णवाहिका प्रदान करताना आ. प्रा. जयंत आसगावकर, सरपंच वसंत तोडकर, उपसरपंच शारदा पाटील, कुंडलिक पाटील, संजय पाटील.

Web Title: Social awareness is important to prevent the corona epidemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.