जयसिंगपूरच्या आदर्श फाउंडेशनची सामाजिक बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:17 AM2021-06-03T04:17:53+5:302021-06-03T04:17:53+5:30

आदर्श फाउंडेशनकडून वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. यातून गरजूंना आर्थिक मदत त्याचबरोबर आरोग्यविषयक सुविधा पुरविल्या जातात. २०१९ च्या महापुरावेळी ...

Social Commitment of Adarsh Foundation of Jaysingpur | जयसिंगपूरच्या आदर्श फाउंडेशनची सामाजिक बांधिलकी

जयसिंगपूरच्या आदर्श फाउंडेशनची सामाजिक बांधिलकी

Next

आदर्श फाउंडेशनकडून वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. यातून गरजूंना आर्थिक मदत त्याचबरोबर आरोग्यविषयक सुविधा पुरविल्या जातात. २०१९ च्या महापुरावेळी देखील मुनीर शेख यांच्या पुढाकारातून पूरग्रस्तांना मदत देण्यात आली होती. गतवर्षी आलेल्या कोरोना संकटावेळीदेखील आदर्श फाउंडेशनने मदतीचा हात दिला होता. पुन्हा एकदा कोरोनाचे संकट उभारल्याने शिरोळ तालुक्यातील शिवार, सिध्दीविनायक, कुंजवन व आगर येथील कोविड सेंटरना मदत देण्यात आली. फाउंडेशनने कोविड सेंटरना केलेल्या मदतीबद्दल तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांनी आभार मानले. यावेळी फाउंडेशनचे अविनाश चौगुले, मुस्ताक सौदागर, अमीन नदाफ, मनोज शहापूरे, नितीन कांबळे, प्रदीप वनमोरे, शेखर चौगुले उपस्थित होते.

फोटो - ०२०६२०२१-जेएवाय-०६

फोटो ओळ - शिरोळ तहसील कार्यालयात आदर्श फाउंडेशनला कोविड सेंटरला केलेल्या मदतीबद्दल आभारपत्र तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी अविनाश चौगुले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Social Commitment of Adarsh Foundation of Jaysingpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.