शासकीय मध्यवर्ती कारागृहातील प्रशासनाने जपली सामाजिक बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:16 AM2021-07-05T04:16:19+5:302021-07-05T04:16:19+5:30
कळंबा : कळंबा शासकीय मध्यवर्ती कारागृहातील कर्मचारी वृंद व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सामाजिक बांधिलकीचे भान जपत रविवारी जेल ...
कळंबा : कळंबा शासकीय मध्यवर्ती कारागृहातील कर्मचारी वृंद व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सामाजिक बांधिलकीचे भान जपत रविवारी जेल परिसरात आयोजित रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त "नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं" आयोजित रक्तदान शिबिरात त्यांनी रक्तदान केले.
यंदा कोरोनाच्या महामारीमुळे सर्वत्र रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत असल्याने लोकमतने रक्तदान शिबिराला यावेळी व्यापक स्वरूप दिले आहे. कोल्हापुरात सर्वच स्तरातून या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कळंबा शासकीय मध्यवर्ती कारागृह प्रशासनातर्फे जेल परिसरात रक्तदान शिबिराचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. कारागृहाचे अधीक्षक चंद्रमनी इंदूरकर यांच्या हस्ते प्रशासनाच्या अधिकारी वर्गाच्या उपस्थितीत याचे उद्घाटन झाले.
यावेळी बोलताना कारागृहाचे अधीक्षक चंद्रमनी इंदूरकर यांनी लोकमतच्या विधायक उपक्रमाचे कौतुक करत सामाजिक बांधिलकीचे भान जपत प्रत्येकाने रक्तदान करण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन केले. उद्घाटनानंतर दिवसभर कर्मचारी वृंदाच्या कुटुंबातील सदस्यांनी परिसरातील नागरिकांची रक्तदान करण्यासाठी गर्दी झाली होती. रक्तदात्यांना जेल कर्मचाऱ्यांच्या वतीने मोफत जेवण देण्यात आले.
रक्तदान शिबिरासाठी कारागृह अधीक्षक चंद्रमनी इंदूरकर, सिनिअर जेलर आर. एस. जाधव, साहेबराव खाडे, तुरुंग अधिकारी एन. डी. श्रेयकर, एस. व्ही. मस्कर, एम. व्ही. ओरे, जेलर एम. व्ही. बाबर, प्रवीण औंडेकर वैद्यकीय अधिकारी गौरीप्रसाद वेताळ आणि समस्त कर्मचारी वृंदाचे सहकार्य लाभले.
चौकट :
कारागृह अधीक्षक चंद्रमनी इंदूरकर प्रत्येक रक्तदान शिबिरात कुटुंबातील सदस्यांसह हिरीरीने सहभागी होतात. अवयवदान उपक्रमासाठी त्यांनी कुटुंबातील सदस्यांसह नोंदणी करत अवयवदान मोहिमेला पाठबळ देण्यासाठी प्रयत्न केले असून, यासाठी जनजागृती करत आहेत. रविवारी आयोजित
रक्तदान शिबिरातील सर्वांसाठी कारागृहाचे अधीक्षक चंद्रमनी इंदूरकर यांनी जेवणाची सोय केली होती.
फोटो मेल केला आहे
फोटो ओळ (फोटो : नसीर आत्तार)
लोकमतचे संस्थापक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त लोकमतच्या वतीने रविवारी कळंबा शासकीय मध्यवर्ती कारागृह परिसरात जेल प्रशासनाचे वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित (कोणतीही फोटो ओळ वापरा)
१)कारागृहाचे अधीक्षक चंद्रमनी इंदूरकर, सिनिअर जेलर राजेंद्र जाधव, जेलर प्रवीण औंडेकर, जेल कर्मचारी वृंद व परिसरातील नागरिक.
२)डावीकडून सारिका मस्कर, जिया श्रेयकर सचिन सुरवसे, उमेश चव्हाण, जेलर प्रवीण औंडकर कारागृहाचे अधीक्षक चंद्रमनी इंदूरकर, सिनिअर जेलर राजेंद्र जाधव, अब्दुल मीरकाशी, संतोष बोलाईकर, ईजाज शेख, गणेश गायकवाड कर्मचारी वृंद व परिसरातील नागरिक.