‘बुलढाणा अर्बन’ची सामाजिक बांधिलकी गौरवास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:22 AM2021-02-07T04:22:34+5:302021-02-07T04:22:34+5:30
गडहिंग्लज : बुलढाणा अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटीने बँकिंगबरोबरच जपलेली सामाजिक बांधिलकी गौरवास्पद आहे, असे गौरवोद्गार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ...
गडहिंग्लज : बुलढाणा अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटीने बँकिंगबरोबरच जपलेली सामाजिक बांधिलकी गौरवास्पद आहे, असे गौरवोद्गार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.
बुलढाणा अर्बन आणि उद्योगपती विजयकुमार राजाराम शहा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय लीलावती राजाराम तुकाराम शहा यांच्या स्मरणार्थ येथील गणेश मंगल कार्यालयात शववाहिकेच्या (स्वर्गरथ) लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे म्हणाले, ‘बुलढाणा अर्बन’ने स्थानिक गरजा व सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांना नेहमीच प्राधान्य दिले आहे. नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी म्हणाल्या, बुलढाणा अर्बनचे विविध सामाजिक उपक्रम कौतुकास्पद आहेत.
उद्योजक पार्थ शहा म्हणाले, गडहिंग्लज शहराने आम्हांला भरपूर दिले आहे.त्यामुळे या शहरासाठी काहीतरी करणे ही आमची जबाबदारी आहे. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, उद्योजक हेमंत शहा, उद्योगपती श्यामसुंदर मर्दा, विजयकुमार शहा, जे. बी. बारदेस्कर, विलास बागी, किरण कदम, वसंतराव यमगेकर आदी उपस्थित होते.
-------
फोटोओळी- गडहिंग्लज येथे बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतर्फे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शववाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा स्वाती कोरी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, किरण कदम,
शिरीष देशपांडे, श्यामसुंदर मर्दा, विजयकुमार शहा, हेमंत शहा उपस्थित होते.
------