समाजशील नेतृत्व : स्वाती सासणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:28 AM2021-01-16T04:28:22+5:302021-01-16T04:28:22+5:30

माणसाच्या अंगात चिकाटी आणि निश्चित ध्येय असल्यास तो कोणत्याही क्षेत्रात कमी पडत नाही. तो आपले नाव पक्के निर्माण करतो. ...

Social Leadership: Swati Sasane | समाजशील नेतृत्व : स्वाती सासणे

समाजशील नेतृत्व : स्वाती सासणे

Next

माणसाच्या अंगात चिकाटी आणि निश्चित ध्येय असल्यास तो कोणत्याही क्षेत्रात कमी पडत नाही. तो आपले नाव पक्के निर्माण करतो. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे उदगाव (ता. शिरोळ) येथील स्वाती सासणे या होय.

खोतवाडी (ता. हातकणंगले) या गावच्या लाटकर या सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. संघर्षातून इंग्रजी विषयात पदवीचा व शिक्षिका बनण्याचा मानस ठेवून बी.एड्‌.पर्यंतचे शिक्षण त्यांनी चिकाटीने पूर्ण केले. त्यानंतर काही काळ शिक्षिका म्हणून, तर उदगांव ग्रामपंचायतीमध्ये रोजंदारीवर कर्मचारी म्हणून तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या सासणे या अपघाताने राजकारणात आल्या.

शिरोळ तालुक्यातील राजकीय विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या उदगावमध्ये राजकारणाचा वारू नेहमीच बदलत राहिला आहे. २०१७ मध्ये शिवसेनेकडून त्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाली. या संधीचे सोने करीत राजकारणात नवख्या असलेल्या स्वाती यांनी विजय मिळवून जिल्हा परिषदेच्या सभागृहात जाण्याचा बहुमान मिळाला. माजी आमदार उल्हास पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आजपर्यंत त्यांनी विकासकामे केली आहेत. उदगाव जिल्हा परिषद मतदार संघात २०१७ ते २०२१ या चार वर्षात तब्बल १५ कोटीची भरीव विकासकामे केली आहेत. २०१७ मध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीवेळी उल्हास पाटील सांगतील तेच, अशी ठाम भूमिका सासणे यांनी घेतली. त्यामुळे २०२० मध्ये झालेल्या सत्ताबदलामध्ये त्यांना समाजकल्याण सभापतिपदाची संधी मिळाली. त्यांच्या या सामाजिक व राजकीय वाटचालीत पेंटिंग व्यवसाय करणारे त्यांचे पती विशाल सासणे यांच्यासह कुटुंबियांची मोलाची साथ मिळाली.

जिल्ह्यातील मागासवर्गीय समाजासाठी असलेल्या सोयी-सुविधांचा अभ्यास करून त्यामध्ये कशा पध्दतीने बदल करता येईल व समाजकल्याण विभागाच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी काम केले. समाजकल्याण विभागाचा २० टक्के निधी व अपंग कल्याण विभागाचा ५ टक्के निधी योग्यवेळी वितरित होण्यासाठी देखील प्रयत्न केले. कोरोना महामारीत उदगाव जि. प. मतदारसंघात आढळून आलेल्या रुग्णांना देखील मदत केली.

जिल्ह्यातील समाजकल्याण विभागातील वसतिगृहाचे प्रश्न समजावून घेतले, तर दिव्यांग विभागांतर्गत असणाऱ्या कार्यशाळांना भेटी देऊन त्या विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध कलाकृतींचे कौतुक केले. लोकाभिमुख लोकप्रतिनिधी सभापती कसा असावा, याचे उत्तम उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

शब्दांकन - शुभम गायकवाड, उदगांव फोटो - १५०१२०२१-जेएवाय-०६-स्वाती सासणे

Web Title: Social Leadership: Swati Sasane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.