सोशल मीडिया साडीच्या डिझाईनमध्येही

By admin | Published: September 15, 2014 11:06 PM2014-09-15T23:06:01+5:302014-09-15T23:22:48+5:30

प्रभाव : साड्यांवर फेसबुक, गुगल, व्हॉटस्अ‍ॅप, हैक, याहू अशा अ‍ॅप्लिकेशनचे सिम्बॉल डिझाईन

In social media sarees design too | सोशल मीडिया साडीच्या डिझाईनमध्येही

सोशल मीडिया साडीच्या डिझाईनमध्येही

Next

अतुल आंबी - इचलकरंजी -आजकाल सर्वच क्षेत्रांत सोशल मीडियाने शिरकाव केला आहे. मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅब या माध्यमांतून वापरल्या जाणाऱ्या अ‍ॅप्लिकेशनचे सिम्बॉल आता साडीवर वापरून डिझाईन तयार करण्यात आले आहे. येथील साडी दुकानात अशा विविध डिझाईनच्या साड्या विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत.
सध्या अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल असणे म्हणजे आपण अपडेट आहोत. त्याचबरोबर नेहमी जगाच्या संपर्कात आहोत, असे मानले जाते. वेगवेगळ्या क्षेत्रांत व्हॉटस् अ‍ॅप, हैक, व्हायबर अशा अ‍ॅप्लिकेशनचा कामासाठी चांगल्या प्रकारे वापर केला जात आहे.
उद्योजक आपल्या फॅक्टरीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कधीही, कोठेही आपल्या फॅक्टरीमध्ये कोणत्या विभागात काय-काय चालले आहे, हे बघू शकतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांनाही मालक आपल्यावर नेहमी नजर ठेऊन असतात, हे माहीत असल्याने कामात कुचराई करता येत नाही. वृत्तपत्र क्षेत्रातही अशा अत्याधुनिक अ‍ॅप्लिकेशनचा वापर करून फोटो, जाहिराती, माहिती
घेणे अतिशय सोपे बनले आहे. याबरोबरच अनेक क्षेत्रांत वेगवेगळ्या पद्धतीने मोबाईल व टॅबवरील विविध अ‍ॅप्स्मुळे काम सोपे बनले आहे. गत लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात झाला आहे.

साडी बनविणाऱ्या कंपन्यांनीही मागे न राहता एक वेगळे आकर्षण म्हणून अशा अ‍ॅप्स्चे सिम्बॉल असलेल्या साड्या डिझाईन करून विक्रीसाठी बाजारात आणल्या आहेत. या साड्यांवर फेसबुक, गुगल, व्हॉटस्अ‍ॅप, हैक, याहू अशा अ‍ॅप्लिकेशनचे सिम्बॉल डिझाईनमध्ये वापरण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या अशा डिझाईनच्या साड्या वेगळे आकर्षण बनत आहेत.

Web Title: In social media sarees design too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.