एव्हरेस्ट मोहिमेसाठी समाजाने बळ द्यावे : कस्तुरी सावेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 11:38 AM2019-12-05T11:38:24+5:302019-12-05T11:39:44+5:30
विद्यार्थ्यांनी आयुष्यात काही निश्चित ध्येयधोरणे आखणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन करून समाज हा काहीतरी वेगळे करू पाहणाऱ्या लोकांच्या पाठीशी नेहमी उभा राहतो. माझ्या एव्हरेस्ट मोहिमेसाठीही समाजाने बळ द्यावे, असे आवाहन कस्तुरी सावेकर हिने केले.
कोल्हापूर : विद्यार्थ्यांनी आयुष्यात काही निश्चित ध्येयधोरणे आखणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन करून समाज हा काहीतरी वेगळे करू पाहणाऱ्या लोकांच्या पाठीशी नेहमी उभा राहतो. माझ्या एव्हरेस्ट मोहिमेसाठीही समाजाने बळ द्यावे, असे आवाहन कस्तुरी सावेकर हिने केले.
सायबर महाविद्यालयातील दिनकरराव शिंदे समाजकार्य विभागातर्फे बुधवारी एव्हरेस्ट मोहिमेसाठी जाणाºया कस्तुरी सावेकर हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी ती बोलत होती. यावेळी कस्तुरीने विद्यार्थ्यांशी संवाद साधत एव्हरेस्ट मोहिमेसंबंधी विविधांगी, विस्तृत माहिती दिली.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थी प्रतिनिधी स्नेहा कुलकर्णी हिच्या प्रार्थनागीताने झाली. प्रास्ताविकपर भाषणात कार्यक्रमाचे आयोजक डॉ. दीपक भोसले यांनी युवकांमध्ये जाणीवपर प्रबोधन होण्यासाठी कस्तुरी सावेकर हिच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली. ‘संवेदना’ या वाहतूक समस्येवर काम करणाºया संघटनेचे अध्यक्ष संजय कात्रे आणि सायबर महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रदीप वायचळ यांच्या हस्ते कस्तुरी सावेकर हिचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे निधी जमा करून तो कस्तुरीकडे सुपूर्द केला. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी तिच्या उपक्रमाचे कौतुक करून येणाऱ्या काळातही मदत करण्याचे आश्वासन दिले.
दीपाली ओमासे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुरेश आपटे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास डॉ. प्रकाश रणदिवे, डॉ. बी. एन. पाटील, प्रा. पूनम माने यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.