मांगनूर तर्फ सावंतवाडीच्या ग्रामपंचायत कार्यालयाची यंत्रणा सौर ऊर्जेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:22 AM2021-04-19T04:22:31+5:302021-04-19T04:22:31+5:30

नेसरी : मांगनूर तर्फ सावतवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सव्वा लाख खर्चून सौर ऊर्जेवर चालणारी विद्युत यंत्रणा राबवली आहे. या ...

Solar system of Gram Panchayat office of Sawantwadi towards Manganur | मांगनूर तर्फ सावंतवाडीच्या ग्रामपंचायत कार्यालयाची यंत्रणा सौर ऊर्जेवर

मांगनूर तर्फ सावंतवाडीच्या ग्रामपंचायत कार्यालयाची यंत्रणा सौर ऊर्जेवर

googlenewsNext

नेसरी : मांगनूर तर्फ सावतवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सव्वा लाख खर्चून सौर ऊर्जेवर चालणारी विद्युत यंत्रणा राबवली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन नूतन सरपंच शालूबाई चव्हाण, उपसरपंच प्रकाश पाटील यांच्या हस्ते झाले.

या सौरऊर्जा प्रकल्पामुळे ग्रामपंचायतीची विजेअभावी थांबणारी कामे आता सुरळीत होणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीचा वीज बिलाचा खर्च येथून पुढे आता शून्य होणार आहे.

सतत वीज पुरवठा सुरू असल्यामुळे फॅन, लाईटसह ऑनलाईन संगणकीय कामकाजात खंड पडणार नसल्याचे ग्रामसेवक हेमंत कांबळे यांनी सांगितले.

नूतन पदाधिका-यांनी विकासात्मक दृष्टिकोन ठेवून सौरऊर्जा प्रकल्प उभारला. ग्रामपंचायतीकडून अशा पद्धतीची कामे होणे म्हणजे समाधानकारक बाब असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त झाली.

यावेळी ग्रा. पं. सदस्य आत्माराम देसाई, शशिकांत नावलगी, सुमन गुरव, शलाका शिंगटे, जनाबाई करडे, दिनकर शिंदे, शंकर सावंत, पोस्टमास्तर सुनील साळवे, विठ्ठल कांबळे, मधुकर कांबळे नाना कांबळे, विजय देसाई, विनोद करडे, सूर्याजी सावंत आदी उपस्थित होते.

-------------------------

* फोटो ओळी : मांगनूर तर्फ सावतवाडी (ता. गडहिंग्लज) येथे सौरऊर्जा पॅनेल उद्घाटप्रसंगी सरपंच-उपसरपंच व मान्यवर उपस्थित होते.

क्रमांक : १८०४२०२१-गड-०५

Web Title: Solar system of Gram Panchayat office of Sawantwadi towards Manganur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.