सैनिक टाकळी चंदूर जुगूळ पुलाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:16 AM2021-07-03T04:16:20+5:302021-07-03T04:16:20+5:30

मिलिंद देशपांडे : दत्तवाड सैनिक टाकळी-चंदूर व खिद्रापूर-जुगूळ या तीन किलोमीटर अंतरावर होणा-या महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कृष्णा नदीवरील पुलामुळे महापुरात ...

Soldier Takli Chandur Jugul bridge work started | सैनिक टाकळी चंदूर जुगूळ पुलाचे काम सुरू

सैनिक टाकळी चंदूर जुगूळ पुलाचे काम सुरू

Next

मिलिंद देशपांडे : दत्तवाड

सैनिक टाकळी-चंदूर व खिद्रापूर-जुगूळ या तीन किलोमीटर अंतरावर होणा-या महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कृष्णा नदीवरील पुलामुळे महापुरात पाण्याचा फुगवटा होऊन शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाडसह दहा गावांना त्याचा फटका बसणार आहे. एकीकडे विकासासाठी रस्ते पूल हवे असलेतरी त्या विकासामुळे परिसर भकास होणार असेल तर तो विकास काय कामाचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खिद्रापूर हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शेवटचे गाव असून खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. २००५ आणि २०१९ च्या महापुरामुळे येथील शेती उद्ध्वस्त झाली होती.

गेली चार-पाच वर्षे झाले टाकळी-चंदूर या पुलाचे बांधकाम सुरू असून दोन वर्षे झाले खिद्रापूर-जुगूळ या पुलाचे काम सुरू आहे. दोन्ही पुलांचे काम कर्नाटक शासन करत आहे. कर्नाटक बाजूचे काम पूर्णत्वास गेले आहे. पण महाराष्ट्राकडील काम अद्याप पूर्ण व्हायचे बाकी आहे. नुकत्याच झालेल्या जूनमधील पावसामुळे टाकळी येथील शेतक-यांची शेतजमीन वाहून गेली आहे.

कर्नाटकातील अंकली येथे कृष्णा नदीवर बांधलेल्या पुलामुळे व त्याभोवती घातलेल्या भरावामुळे पाण्याचा फुगवटा होऊन शिरोळ तालुक्यात महापूरसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. त्यातच आता सैनिक टाकळी-चंदूर व खिद्रापूर-जुगूळ या दोन पुलांचे काम सुरू असून पुलाला जोडणा-या रस्त्यांसाठी दोन्ही बाजूला भराव घातला जाणार आहे. त्यामुळे महापुरात पाणी जाण्यास अडथळा निर्माण होऊन या पाण्याचा फुगवटा कुरुंदवाड, राजापुरवाडी, खिद्रापूर, राजापूर, आलास, बुबनाळ, अकिवाट व बस्तवाड या गावांना बसणार आहेत.

-------------------

कोट - पुलांच्या भरावामुळे महापुरात पाण्याचा फुगवटा होऊन शेती भकास होणार आहे. त्यामुळे आतापासून दोन्ही बाजूला भराव घालताना त्यात पाणी जाण्यासाठी पाईप घालाव्यात. यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कर्नाटक शासन पूल बांधताना या सर्वांचा विचार करावा.

- विशाल चौगुले, सरपंच, अकिवाट

फोटो - ०२०७२०२१-जेएवाय-०३

फोटो ओळ - सैनिक टाकळी - चंदूर या मार्गावरील कृष्णा नदीवरील पुलाचे काम सुरू आहे.

Web Title: Soldier Takli Chandur Jugul bridge work started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.