सैनिक टाकळीच्या विकासासाठी कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:23 AM2021-03-08T04:23:14+5:302021-03-08T04:23:14+5:30
: आढावा बैठक दत्तवाड : सैनिक टाकळीच्या विकासासाठी राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून भरघोस निधी मिळवून देणार आहे. विविध ...
: आढावा बैठक
दत्तवाड : सैनिक टाकळीच्या विकासासाठी राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून भरघोस निधी मिळवून देणार आहे. विविध विकासकामांच्या माध्यमातून गावचा चेहरामोहरा बदलून टाकू, असा आशावाद खासदार धैर्यशील माने यांनी दिला.
सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथे आढावा बैठकीत खासदार माने बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच हर्षदा पाटील होत्या. यावेळी माजी आमदार उल्हास पाटील यांनी गावची प्रलंबित कामे लवकरच मार्गी लागतील असे आश्वासन दिले. राज्य शासनाने माजी सैनिकांना घरफाळा माफी केल्याने ग्रामपंचायतीची मिळकत ८० टक्क्यांनी कमी झाली असल्याचे समजताच खासदार माने यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. शासनाकडून माफ झालेली रक्कम अनुदान रुपाने ग्रामपंचायतीस मिळणार असल्याचे मंत्र्यांनी दूरध्वनीवरून सांगितले असता ग्रामस्थांनी या गोष्टीचे जोरदार स्वागत केले. कार्यक्रमास मधुकर पाटील, वैभव उगळे, उपसरपंच सुदर्शन भोसले, पोलीस पाटील सुनीता पाटील, ग्रामसेवक एस. एम. वाघमोडे, संभाजी गोते, संतोष गायकवाड ,वाल्मीक कोळी, उमेश पाटील, अशोक गायकवाड, शामराव पाटील, संभाजी पाटील, ए. वाय. पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.