शिवरायांच्या पुतळ्याच्या जागेचा प्रश्न सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:20 AM2021-01-09T04:20:15+5:302021-01-09T04:20:15+5:30
सांगली-कोल्हापूर महामार्गावर प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी जागा आरक्षित केली आहे. मात्र, जागेसाठी शासनाने ...
सांगली-कोल्हापूर महामार्गावर प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी जागा आरक्षित केली आहे. मात्र, जागेसाठी शासनाने जवळपास सव्वादोन कोटी रुपयांचा महसूल भरण्याबाबतचे आदेश दिले आहेत. ही जागा विनामोबदला मिळावी यासाठी शिवप्रेमींकडून नगरपालिकेला साकडे घातले आहे. त्यामुळे शिवरायांच्या पुतळ्याच्या प्रलंबित जागेचा प्रश्न तत्काळ सोडवावा. शिवाय, २० वर्षांपासून शहरात वसलेल्या शिंदे कॉलनी, संस्कृती कॉलनी यांसह १३ उपनगरांमध्ये सेवासुविधा पुरविण्यासाठी पाच कोटी रुपयाचा निधी मिळावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी नगरसेवक पराग पाटील उपस्थित होते.
फोटो - ०८०१२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - कोल्हापूर येथे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना मागण्यांबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, नगरसेवक पराग पाटील उपस्थित होते.