झोपडपट्ट्यांचा प्रश्न तातडीने निकालात काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:23 AM2021-03-14T04:23:01+5:302021-03-14T04:23:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरातील झोपडपट्टीधारकांच्या नियमितीकरणाचा प्रश्न कोणत्याही परिस्थितीत तातडीने निकाली काढा, अशा स्पष्ट सूचना ग्रामविकास ...

Solve the slum issue immediately | झोपडपट्ट्यांचा प्रश्न तातडीने निकालात काढा

झोपडपट्ट्यांचा प्रश्न तातडीने निकालात काढा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरातील झोपडपट्टीधारकांच्या नियमितीकरणाचा प्रश्न कोणत्याही परिस्थितीत तातडीने निकाली काढा, अशा स्पष्ट सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या.

येथील शासकीय विश्रामगृहावर ही बैठक झाली. यावेळी प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे व गडहिंग्लज नगर परिषदेचे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

मुश्रीफ म्हणाले, अधिकाऱ्यांनी झोपडपट्टीधारकांची तातडीने बैठक घ्यावी. झोपड्यांच्या नियमितीकरणासह त्यांचे सर्व प्रश्न निकालात काढावेत. यावेळी दुंडगा मार्ग, शेंद्री रोड, मेटाचा मार्ग, लाखेनगर, डवरी वसाहत, इराणी वसाहत येथील झोपडपट्टीधारक उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष महेश सलवादे, शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, नगरसेवक हारुण सय्यद, नगरसेविका शुभदा पाटील, गुंड्या पाटील, सुरेश म्हेत्री, इक्बाल नायकवडी, अमर म्हेत्री, विनायक डोनवाडे, विकास पोवार, पूनम म्हेत्री, गंगाराम माकडवाले, माधवी जाधव, भरत कांबळे आदी उपस्थित होते.

-

फोटो ओळी

: गडहिंग्लज येथील झोपडपट्टीधारकांच्या बैठकीत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, सिद्धार्थ बन्ने, गुंड्या पाटील, महेश सलवादे, शुभदा पाटील उपस्थित होते.

Web Title: Solve the slum issue immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.