झोपडपट्टयांचा प्रश्न तातडीने निकालात काढा :हसन मुश्रीफ यांची सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 11:12 AM2021-03-15T11:12:22+5:302021-03-15T11:13:53+5:30
Hasan Mushrif Gadhinglaj Kolhapur- गडहिंग्लज शहरातील झोपडपट्टी धारकांच्या नियमितीकरणाचा प्रश्न कोणत्याही परिस्थितीत तातडीने निकाली काढा, अशा स्पष्ट सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या.
गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरातील झोपडपट्टी धारकांच्या नियमितीकरणाचा प्रश्न कोणत्याही परिस्थितीत तातडीने निकाली काढा, अशा स्पष्ट सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या.
येथील शासकीय विश्रामगृहावर ही बैठक झाली.प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे व गडहिंग्लज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
मुश्रीफ म्हणाले, अधिकाऱ्यांनी झोपडपट्टी धारकांची तातडीने बैठक घ्यावी. झोपड्यांच्या नियमितीकरणासह त्यांचे सर्व प्रश्न निकालात काढावेत. यावेळी दुंडगा मार्ग, शेंद्री रोड, मेटाचा मार्ग, लाखेनगर, डवरी वसाहत, इराणी वसाहत या झोपडपट्ट्यांमधील झोपडपट्टीधारक उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष महेश सलवादे,शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, नगरसेवक हारुण सय्यद, नगरसेविका शुभदा पाटील, गुंड्या पाटील, सुरेश म्हेत्री,इक्बाल नायकवडी, अमर म्हेत्री, विनायक डोनवाडे, विकास पोवार, पुनम म्हेत्री, गंगाराम माकडवाले, माधवी जाधव, भरत कांबळे आदी उपस्थित होते.