जुनी पेन्शन, वरिष्ठ श्रेणीसह विविध प्रलंबित प्रश्न सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:20 AM2021-02-08T04:20:56+5:302021-02-08T04:20:56+5:30

कोल्हापूर : जुनी पेन्शन योजना, शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी लागू करणे आदी प्रलंबित प्रश्न सोडवा, अशी मागणी कोल्हापुरातील शिक्षक संघाने ...

Solve various pending issues including old age pension, senior category | जुनी पेन्शन, वरिष्ठ श्रेणीसह विविध प्रलंबित प्रश्न सोडवा

जुनी पेन्शन, वरिष्ठ श्रेणीसह विविध प्रलंबित प्रश्न सोडवा

Next

कोल्हापूर : जुनी पेन्शन योजना, शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी लागू करणे आदी प्रलंबित प्रश्न सोडवा, अशी मागणी कोल्हापुरातील शिक्षक संघाने केली. त्याबाबतचे निवेदन या संघाच्या शिष्टमंडळाने शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना दिले. १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. शिक्षकांना १०, २०, ३० या टप्प्यानुसार वरिष्ठ श्रेणी मिळावी. महापालिका शाळांमधील शिक्षकांचे वेतन अनुदान शासनाकडून शंभर टक्के मिळावे. राज्यातील सर्व प्राथमिक शाळांना इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीचे वर्ग विनाअट जोडण्यात यावेत. सर्व विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी. एमएससीआयटी मुदतवाढीबाबत शासन निर्णय पारित करावा. शिक्षण सेवक योजना रद्द करावी, आदी मागण्यांच्या अनुषंगाने सर्व प्रश्नांची सोडवणूक व्हावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रवीकुमार पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा लक्ष्मी पाटील, राज्य संपर्कप्रमुख एस. व्ही. पाटील, आनंदराव जाधव, रघुनाथ खोत, सुनील पाटील, सुरेश कांबळे, रावसाहेब पाटील, विष्णू काटकर, राजेश वाघमारे आदी उपस्थित होते.

Web Title: Solve various pending issues including old age pension, senior category

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.