"काहींनी फडणवीसांचा गैरफायदा घेतला"; हसन मुश्रीफ यांची समरजित घाटगेंवर नाव न घेता टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 10:07 PM2024-09-09T22:07:44+5:302024-09-09T22:09:01+5:30
Hasan Mushrif : मंत्री हसन मुश्रीफ यांनी समरजित घाटगे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.
Hasan Mushrif ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहे, या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात आरोप - प्रत्यरोप सुरु आहेत. दोन दिवसापूर्वी कागल येथील भाजपा नेते समजित घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत, आज कोल्हापूर येथील एका सभेत मंत्री हसन मुश्रीफ यांनी समरजित घाटगे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.
कोल्हापूर येथील सभेत बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्यावरून एक लक्षात येते, एखादा व्यक्ती किती गैरफायदा घेऊन विश्वास करू शकतो. त्यांचा त्यांनी विश्वासघात केला, असा नाव न घेता मुश्रीफ यांनी समरजीतसिंह घाटगे यांच्यावर निशाणा साधला.
समरजित घाटगे अधिकृतपणे शरद पवार गटात
राज्यात काही दिवसातच राज्यात विधानसभा निवडणुका सुरू जाहीर होणार आहेत. याआधी महायुतीने तयारी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कागलमध्ये हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केली, यामुळे समरजीत घाटगे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.
मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करत आहे की, ही परिवर्तनाची मुहुर्तमेढ आहे. आताच कुणीही विजयाचा आनंद साजरा करु नका, पुढच्या दोन महिन्यांत आपल्याला खूप काम करायचे आहे. कागलमध्ये प्रत्येक घराघरात शरद पवारांचा विचार आपल्याला घेऊन जायचा आहे. प्रत्येक घरापर्यंत तुतारी पोहोचवायची आहे, त्यासाठी काम करा. कागलमध्ये १०० टक्के परिवर्तन होणार आहे. पक्षात आणखी अनेकांचा प्रवेश होणार आहे, असा दावा समरजितसिंह घाटगे यांनी केला आहे. अखेर भाजपामध्ये असलेल्या समरजितसिंह घाटगे यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतपणे प्रवेश झाला.
यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना समरजितसिंह घाटगे म्हणाले की, शरद पवार यांनीच सांगितले की, सभा गैबी चौकात घ्या. काही जणांना वाटत होत गैबी चौकातच आपलीच सभा होईल. पण हा वस्तादांचाच गैबी चौक आहे. स्वर्गीय मंडलिक आणि घाटगे यांनी राजकीय विरोध प्रामाणिकपणे केला. त्यांचा संघर्ष प्रामाणिक राहिला आहे. त्यांनी कागलचा पुरोगामी विचार पुढे नेला तेच मी करणार. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढचे राजकारण करणार. या कागलच्या भूमीत परिवर्तन करणारच, असा निर्धार समरजितसिंह घाटगे यांनी बोलून दाखवला.