तिलारी घाटात वाघाचे दर्शन?, व्हिडिओ व्हायरल; पण..

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 02:07 PM2022-12-30T14:07:34+5:302022-12-30T19:18:37+5:30

प्रवाशांनी खबरदारी घेऊन घाटातून प्रवास करावा, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

Some youths see a tiger in Tilari ghat?, video viral; However | तिलारी घाटात वाघाचे दर्शन?, व्हिडिओ व्हायरल; पण..

तिलारी घाटात वाघाचे दर्शन?, व्हिडिओ व्हायरल; पण..

Next

निंगाप्पा बोकडे

चंदगड : तिलारी घाटात (ता. चंदगड) बुधवारी (दि.२८) मध्यरात्री काही तरुणांना वाघाचे दर्शन झाल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. मात्र हा वाघ नसून बिबट्या असल्याचे या स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, प्रवाशांनी खबरदारी घेऊन घाटातून प्रवास करावा, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

चंदगड तालुक्यातील किरमटेवाडी येथील अनिल किरमटे, ज्ञानेश्वर धुरी, महेंद्र किरमटे, शुभम किरमटे, आकाश मासरणकर, अनिकेत किरमटे हे तरुण बुधवारी रात्री गोव्यातून गावाकडे परत येत होते. दरम्यान तिलारी घाटात त्यांना वाघ दिसला. घाटातील एका वळणावर रस्त्याच्या एका कडेला तो निवांत बसला होता. गाडीचा प्रकाशझोत पडल्यानंतर तो उठून उभा राहिला आणि काही वेळातच जंगलात पुढे निघून गेला. याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. मात्र हा वाघ नसून बिबट्या असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

मात्र, यापूर्वीही तिलारी घाटात वाघाचे वास्तव असल्याचे समोर आले आहे. अनेकदा त्याचे फोटो वनविभागाच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. मात्र, पर्यटकांना दिसलेला वाघ नसून तो बिबट्या असल्याचे स्पष्ट होते. 

Web Title: Some youths see a tiger in Tilari ghat?, video viral; However

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.